September 10, 2024 12:14 PM
18
ऑस्ट्रेलिया लहान मुलांना समाज माध्यमांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी समाज माध्यमांसाठी किमान वयाचा कायदा करणार
लहान मुलांना समाज माध्यमांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं सरकार समाज माध्यमांसाठी किमान वयाचा कायदा करणार आहे. हा कायदा मुलांच्या सुरक्षेची काळजी घेऊन पालकांना सहाय्य करेल असं ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँटोनी अल्बनीज यांनी म्हटलं आहे. लहान मुलांचा समाजमाध्यमं आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढत असून, त्याचे गंभीर परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहेत. या गोष्टीची देशातल्या दोन तृतीयांश पालकांना चिंता वाटत असल्याचं राष्ट्रीय स्तरावरच्या सर्वेक्षणात आढळून आल्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारनं ह...