November 13, 2025 7:03 PM November 13, 2025 7:03 PM

views 31

भारताच्या प्रोजेक्ट चित्ताला बोत्सवानाची  ८ चित्त्यांची देणगी

भारताच्या प्रोजेक्ट चित्ताला बोत्सवानाने  ८ चित्त्यांची देणगी दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गॅबोरोन संरक्षित अरण्यात या  प्रतिकात्मक हस्तांतरणाचा सोहळा झाला. बोत्सवानाचे अध्यक्ष ड्यूमा बोको देखील यावेळी उपस्थित होते. बोत्सवानातल्या घांझी जंगलातून आणलेले हे चित्ते भारतात पोहोचल्यावर त्यांना सुरुवातीला काही काळ विलगीकरणात ठेवलं जाईल. यापूर्वी नामिबियामधून ८ तर दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते आणले आहेत. त्यातले बहुतेक सगळे इथल्या वातावरणाला सरावले आहेत.     राष्ट्रपती द्...

November 13, 2025 1:03 PM November 13, 2025 1:03 PM

views 58

बोत्सवानाकडून भारताला ८ चित्त्यांचं हस्तांतरण होणार

प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत भारतातील चित्त्यांची संख्या वाढविण्यासाठी बोत्स्वाना आज आठ चित्ते भारताला हस्तांतरित करणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि बोत्सवानाचे राष्ट्रपती डुमा बोको यांच्यातल्या द्विपक्षीय चर्चेनंतर  संयुक्त पत्रकार परिषदेत काल ही घोषणा करण्यात आली. दोन्ही देशांमधे वन्यजीव संवर्धनात द्विपक्षीय सहकार्याचा एक नवीन अध्याय यातून सुरु होत आहे.    दरम्यान, दोन्ही राष्ट्रपतींच्या द्विपक्षीय चर्चेनंतर, आरोग्यसेवा आणि औषधनिर्माण क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले. भारत बोत्सवानाल...