November 23, 2024 8:26 PM November 23, 2024 8:26 PM

views 16

वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी विजयी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सत्यन मोकेरी यांचा ४ लाख १० हजार ९३१ मतांच्या फरकानं पराभव केला. प्रियांका यांना ६ लाख २२ हजार ३३८, तर मोकेरी यांना १ लाख ११ हजार ४०७ मतं मिळाली. भाजपाच्या नव्या हरिदास तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. त्यांना १ लाख ९ हजार ९३९ मतं मिळाली. दरम्यान, नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू आहे. भाजपाचे संतुकराव हंबर्डे...

November 17, 2024 7:41 PM November 17, 2024 7:41 PM

views 10

१० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रबाहेर गेल्याची प्रियंका गांधींची टीका

महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले, यामुळे राज्यातली दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक बाहेर गेली, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे. त्या आज गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होत्या.    केंद्र सरकार महत्त्वाची बंदरं, विमानतळ आणि अन्य सरकारी कंपन्या उद्योगपतींच्या घशात घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात अडीच लाख रिक्त पदं असून बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, युवक आत्महत्या करत आहेत, त्यांच्यासाठी काही करण्...

November 17, 2024 3:42 PM November 17, 2024 3:42 PM

views 10

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांची गडचिरोली इथं प्रचारसभा

महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले, यामुळे राज्यातली दहा लाख कोटींची गुंतवणूक बाहेर गेली, आठ लाख नोकऱ्या गेल्या, आणि ६ हजारपेक्षा जास्त कंपन्या बंद पडल्या, असा आरोप काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी केला. त्या आज गडचिरोली इथं प्रचारसभेत बोलत होत्या. स्वातंत्र्यानंतर देशभरात मोठमोठे उद्योग, संस्था, निर्माण झाल्या. कोणत्याही सरकारने जनतेसोबत भेदभाव केला नाही. मात्र महायुती आणि भाजपाचं सरकार जनतेसोबत भेदभाव करतं, अशी टीका गांधी यांनी केली. प्रधानमंत्री नर...

November 16, 2024 6:30 PM November 16, 2024 6:30 PM

views 21

केंद्र सरकारनं जातीवर आधारित जनगणना करून आरक्षणावरची ५० टक्के मर्यादा हटवावी – काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी

केंद्र सरकारनं जातीवर आधारित जनगणना करून आरक्षणावरची ५० टक्के मर्यादा हटवावी असं काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. त्या आज शिर्डीत साकोरी इथं प्रचारसभेत बोलत होत्या. गेली १० वर्ष केंद्रात सत्तेत असूनही सरकारला लाडक्या बहिणींबाबत आताच का विचार करावासा वाटलं असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रातले उद्योग अन्य राज्यात स्थलांतरित करून राज्यात बेरोजगारी वाढीला लावण्याबाबत केंद्र तसंच राज्य सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागेल असं त्या म्हणाल्या. या सरकारनं संविधानाचं अवमूल्यन केल्याची टीका प...

November 3, 2024 7:13 PM November 3, 2024 7:13 PM

views 14

वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज जाहीर सभा घेतली

केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार प्रियांका गांधी आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज जाहीर सभा घेतली. प्रियांका गांधी कोरोम आणि थरिओडे इथंही प्रचारसभा घेणार आहेत. तर राहुल गांधी अरीकोड इथं प्रचारसभा घेणार आहेत.   एलडीएफचे उमेदवार सत्यन मोकेरी यांनी तिरुवंबडी भागात प्रचार केला, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार नव्या हरिदास यांनी कलपेट्टा इथं घरोघरी जाऊन प्रचार केला.  

October 23, 2024 8:32 PM October 23, 2024 8:32 PM

views 12

वायनाड मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी प्रियांका गांधी यांचा उमेदवारी अर्ज

केरळमधल्या वायनाड मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून प्रियांका गांधी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी त्या कलपेट्टा इथं आयोजित केलेल्या रोड शो मध्ये सहभागी झाल्या. वायनाडचा भाग होणं ही आपल्यासाठी आनंद आणि सन्मानाची बाब असल्याचं यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्य...

June 17, 2024 8:34 PM June 17, 2024 8:34 PM

views 14

वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातल्या रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. ते आता रायबरेलीचं प्रतिनिधित्व करतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज ही घोषणा केली.    राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या वायनाडच्या जागेवर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढवतील, असं खरगे यांनी जाहीर केलं.