January 9, 2025 1:50 PM
29
प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक प्रितीश नंदी यांचं काल रात्री निधन
प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक प्रितीश नंदी यांचं काल रात्री निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. साहित्यविश्वातल्या योगदानासाठी त्यांना १९७७ मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. ते राज्यसभेचे खासदारही होते. १९९०च्या दशकात दूरदर्शनवर ‘द प्रितीश नंदी शो’ हा मुलाखतींचा कार्यक्रम ते करत असत. ‘प्रितीश नंदी कम्युनिकेशन्स’ या कंपनीद्वारे त्यांनी २०००च्या दशकात अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली. इंग्रजीत लेखन, तसंच बंगाली, उर्दू आणि पंजाबी कवितांचं इंग्रजीत भाषांतरही प्रितीश नंदी यांनी के...