July 18, 2025 11:07 AM July 18, 2025 11:07 AM

views 26

पृथ्वी 2 आणि अग्नि 1 या लघु पल्ल्याच्या बॅलास्टिक क्षेपणास्त्रांची भारताकडून यशस्वी चाचणी

अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पृथ्वी 2 आणि अग्नि 1 या लघु पल्ल्याच्या बॅलास्टिक क्षेपणास्त्रांची भारतानं यशस्वी चाचणी केली आहे. ओडिशाच्या किनाऱ्याजवळच्या चांदीपूर इथल्या एकात्मिक तळावरून ही यशस्वी चाचणी घेऊन देशाच्या संरक्षण दलांच्या सामरिक प्रतिकार क्षमता दाखवून दिली. या दोन्ही क्षेपणास्त्रांची कार्यचालन आणि तांत्रिक घटकांची पडताळणी पूर्ण झाली असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. पृथ्वी 2 या क्षेपणास्त्राचा पल्ला साडेतीनशे किलोमीटरचा असून पाचशे किलोपर्यंत आण्विक शस्त्रास्त्र वाहू...

August 23, 2024 1:49 PM August 23, 2024 1:49 PM

views 13

पृथ्वी-२ या आण्विक क्षमतेच्या बॅलिस्टीक क्षेपणास्त्राची आणखी एक चाचणी यशस्वी

भारताने काल पृथ्वी-२ या आण्विक क्षमतेच्या बॅलिस्टीक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. रात्री ओदिशातल्या समुद्रकिनाऱ्यावर ही चाचणी झाली. डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेलं हे क्षेपणास्त्र ५०० ते एक हजार किलोग्रॅम वजनाचा शस्त्रभार घेऊन जाऊ शकते. पृष्ठभागावरुन साडेतीनशे किलोमीटर पर्यंत मारा करु शकणाऱ्या पृथ्वी-२ ला दोन इंजिनं लावली आहेत. या चाचणीच्या वेळी डीआरडीओचे अधिकारी तसंच वैज्ञानिक  उपस्थित होते.