May 3, 2025 1:03 PM May 3, 2025 1:03 PM
6
राजपुत्र प्रिन्स हॅरी यांनी ब्रिटिश राजघराण्याशी संबंध पुनर्स्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली
ब्रिटनचे माजी राजपुत्र प्रिन्स हॅरी यांनी ब्रिटिश राजघराण्याशी संबंध पुनर्स्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बीबीसी ने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ब्रिटिश राजघराण्याचा सक्रिय सदस्य म्हणून आपल्या भूमिकेचा त्यांनी आपल्या पत्नीसह २०२० साली त्याग केला होता आणि अमेरिकेत स्थलांतर केलं होत . त्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्यात आल्याबद्दल त्यांनी राजघराण्याला जबाबदार धरलं होत. सुरक्षाव्यवस्था पुन्हा पहिल्याप्रमाणे करण्यासाठी दाखल केलेली याचिका ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने काल फेटाळली...