October 31, 2025 2:51 PM October 31, 2025 2:51 PM

views 89

प्रिन्स अँड्र्यू यांची शाही सुविधा काढून घेण्याची औपचारिक प्रक्रिया सुरु

ब्रिटनचे राजे  किंग चार्ल्स तिसरे यांनी, त्यांचे धाकटे बंधू प्रिन्स अँड्र्यू यांना त्यांच्या शाही पदव्यांपासून दूर करण्याची तसंच विंडसरमधलं त्यांचं निवास आणि शाही सुविधा काढून घेण्याची औपचारिक प्रक्रिया सुरु केली आहे. ६५ वर्षांचे प्रिन्स अँड्र्यू यांच्यावर दिवंगत व्हर्जिनिया गिफ़्रे यांनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता, तो अँड्र्यू यांनी सातत्यानं फेटाळला होता. त्यांना आता शाही निवासस्थान सोडून खासगी निवासस्थानी रहायला जावं लागणार आहे, असं बँकिंगहॅम पॅलेसच्या निवेदनात म्हटलं आहे.