September 26, 2024 2:09 PM September 26, 2024 2:09 PM

views 10

मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार होतं.

July 15, 2024 8:09 PM July 15, 2024 8:09 PM

views 13

नेपाळचे प्रधानमंत्री म्हणून के पी शर्मा ओली यांचा शपथविधी

नेपाळचे नवीन प्रधानमंत्री म्हणून के पी शर्मा ओली यांनी आज शपथ घेतली. नव्यानं तयार झालेल्या आघाडीतल्या चार पक्षांच्या २१ सदस्यांनीही त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी या सर्वांना पद  आणि गोपनीयतेची शपथ दिली.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी के पी शर्मा ओली यांचं अभिनंदन केलं आहे. भारत-नेपाळ मैत्री अधिक दृढ करण्यासाठी, तसंच उभयपक्षी लाभाचं सहकार्य वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याकरता आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे.  

June 29, 2024 3:42 PM June 29, 2024 3:42 PM

views 5

पंतप्रधान आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम ऐकता येईल.