December 8, 2024 1:42 PM December 8, 2024 1:42 PM

views 10

क्षयरोगाचा नायनाट करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

देशाच्या टीबी विरोधातल्या लढ्यात, अधिक रुग्णसंख्या असलेल्या टीबी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून १०० दिवसांच्या विशेष मोहीमेमुळे देश बळकट झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरील एका संदेशात मोदी यांनी सांगितलं की, रुग्णांना दुप्पट मदत, जन भागिदारी, नवीन औषधं, तंत्रज्ञानाचा वापर आणि निदानाची उत्तम साधनं यासह भारत विविध पद्धतींनी टीबीशी लढा देत आहे. क्षयरोगाचा नायनाट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान, देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियाना...

December 8, 2024 10:34 AM December 8, 2024 10:34 AM

views 6

सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत योगदान देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

देशाच्या शूर जवानांच्या शौर्य, निर्धार आणि बलिदानाला सलाम करण्यासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. जवानांचं शौर्य आपल्याला प्रेरणा देतं आणि त्यांच्या त्यागापुढं आपण सर्वच नतमस्तक होतो, असं आपल्या संदेशात मोदी यांनी म्हंटलं आहे. सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत योगदान देण्याचं आवाहनही त्यांनी काल केलं.

December 7, 2024 2:18 PM December 7, 2024 2:18 PM

views 11

देशभरात ८५ नवीन केंद्रीय विद्यालयं सुरू करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं प्रधानमंत्र्यांनी केलं कौतुक

देशभरात ८५ नवीन केंद्रीय विद्यालयं सुरू करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. जास्तीत जास्त लोकांना शालेय शिक्षण मिळावं यासाठी सरकारनं हा मोठा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असून रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील असं ते म्हणाले.

December 7, 2024 8:01 PM December 7, 2024 8:01 PM

views 2

अहमदाबाद इथं बीएपीएस कार्यकर्ता सुवर्ण महोत्सवाला प्रधानमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित केलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथं आयोजित  बीएपीएस कार्यकर्ता सुवर्ण महोत्सवाला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित केलं. रशिया युक्रेन युद्धादरम्यान भारतीयांना सुरक्षित मायदेशी परतण्यात बीएपीएस च्या कार्यकर्त्यानी केलेल्या मदतीची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली. भारताच्या ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेची जगभरात चर्चा होत असल्याचं त्यांनी सांगितलं. अबू धाबीमध्ये नुकत्याच उभारण्यात आलेल्या स्वामीनारायण मंदिरासारख्या उपक्रमातून जग भारताची सांस्कृतिक विविधता आणि अध्यात्मिक वारसा  जाणून घेत आहे, ...

December 3, 2024 2:25 PM December 3, 2024 2:25 PM

views 3

प्रधानमंत्र्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याशी तामिळनाडूतल्या पूरपरिस्थितीबाबत दूरध्वनीवरून केली चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याशी तामिळनाडूतल्या पूरपरिस्थितीबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली. प्रधानमंत्र्यांनी तामिळनाडूला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.  

November 12, 2024 10:05 AM November 12, 2024 10:05 AM

views 11

रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्र्यांची घेतली भेट

रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी दोन्ही देशातील व्यापार,आर्थिक संबंध, ऊर्जा आदी विविध क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्याविषयी सविस्तर चर्चा केली. मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना शुभेच्छा देत भारत आणि रशियातील धोरणात्मक सहकार्याचे संबंध दृढ करण्यासाठी दोन्ही बाजूंनी झालेल्या प्रयत्नांची यावेळी प्रशंसा केली.  

November 12, 2024 10:02 AM November 12, 2024 10:02 AM

views 2

मॉरिशसमधील निवडणूकीतील विजयाबद्दल प्रधानमंत्र्यांनी डॉ. रामगुलाम यांचं केलं अभिनंदन

मॉरिशसमधील निवडणूकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर नवीन रामगुलाम यांचं अभिनंदन केलं आहे. मॉरिशसचं नेतृत्व करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देत पंतप्रधान मोदी यांनी डॉक्टर रामगुलाम यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलं. तसंच दोन्ही देशातील सहकार्य सक्षम करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक असल्याचं मोदी म्हणाले.

October 18, 2024 3:14 PM October 18, 2024 3:14 PM

views 1

प्रधानमंत्री उद्या कर्मयोगी सप्ताह या राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचे उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी कर्मयोगी सप्ताह या राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचं उद्घाटन दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सभागृहात करणार आहेत. या राष्ट्रीय शिक्षण सप्ताहा दरम्यान विविध मंत्रालये आणि संस्था यांच्याद्वारे परिसंवाद आणि कार्यशाळांचं आयोजन करण्यात येणार आहे.  

October 15, 2024 1:55 PM October 15, 2024 1:55 PM

views 5

देशाच्या कानाकोपऱ्यातल्या नागरिकांपर्यंत सोयी सुविधा पुरवण्यासाठी भारतानं डिजिटल यंत्रणांचा प्रभावी वापर केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

देशाच्या कानाकोपऱ्यातल्या नागरिकांपर्यंत सोयी सुविधा पुरवण्यासाठी डिजिटल यंत्रणांचा प्रभावी वापर भारतात सुरू असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेच्या जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषदेच्या उद्घाटनसत्रात ते बोलत होते. आशिया प्रशांत क्षेत्रात पहिल्यांदाच ही परिषद होत आहे. ८ व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. दूरसंचार आणि संबंधित तंत्रज्ञान क्षेत्रांचा विचार करता भारतात सध्या मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत...

October 12, 2024 12:12 PM October 12, 2024 12:12 PM

views 11

दोन दिवसांच्या लाओ दौऱ्यानंतर प्रधानमंत्री मायदेशी परतले

हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राचा विकास आणि शांतता यासाठी इथल्या सर्व देशांनी मुक्त, सर्वसमावेशक, विकासानुकूल असणं आणि नियमांचं पालन करणं गरजेचं आहे असं ठाम प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 19 व्या पूर्व आशियाई देशांच्या शिखर परिषदेत केलं. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रासाठी दक्षिण चीन समुद्रात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य कायम असणं महत्त्वाचं आहे या मुद्द्यावरही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात भर दिला. जगात विविध देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत चिंता व्यक्त करताना सर्वांचाच दृष्टीको...