February 4, 2025 2:23 PM February 4, 2025 2:23 PM

views 6

सिक्कीम भाजपने प्रधानमंत्री तसेच पर्यावरण मंत्र्यांना तिस्ता-III जलविद्युत प्रकल्पाच्या मंजुरीचे पुनर्मूल्यांकन करण्याची केली विनंती

सिक्कीममधल्या वादग्रस्त तिस्ता-III जलविद्युत प्रकल्पाच्या मंजुरीचं त्वरित पुनर्मूल्यांकन करावं अशी विनंती प्रदेश भाजपानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून केली आहे. सिक्कीम भाजपा प्रदेशाध्यक्ष डी. आर. थापा यांनी लिहिलेल्या या पत्रात, प्रकल्पाच्या मंजुरीमध्ये असलेला वैज्ञानिक पुनर्मूल्यांकनाचा अभाव, कालबाह्य सार्वजनिक सल्लामसलत आणि पर्यावरण विषयक संभाव्य जोखमींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. प्रकल्पाला मंजुरी देण्यापूर्वी हवामान विषयक अद्ययावत डेटा...

January 19, 2025 8:50 AM January 19, 2025 8:50 AM

views 20

प्रधानमंत्री आकाशवाणीवर ‘मन की बात’द्वारे जनतेशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज  11 वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशविदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत.  हा या कार्यक्रमाचा एकशे अठरावा (११८) भाग आहे.    हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच आकाशवाणीचं संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वरून प्रसारित केला जाणार आहे. त्याशिवाय हा कार्यक्रम एआयआर न्यूज, डीडी  न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिनीवरून थेट प्रसारित केला जाणार आहे.

January 16, 2025 2:21 PM January 16, 2025 2:21 PM

views 13

प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्टार्ट अप इंडिया या योजनेला आज ९ वर्षं पूर्ण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्टार्ट अप इंडिया या योजनेला आज ९ वर्षं पूर्ण होत आहेत. या निमित्ताने प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर विशेष संदेश लिहिला आहे. सरकारने देशात स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. सरकारच्या गेल्या नऊ वर्षांतल्या धोरणांमुळे असंख्य तरुणांना सक्षम केलं असून त्यांच्या कल्पनांना वास्तवात आणलं आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.

January 16, 2025 10:30 AM January 16, 2025 10:30 AM

views 10

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरचे अध्यक्ष थरमन षण्मुगरत्नम यांची नवी दिल्लीत घेणार भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरचे अध्यक्ष थरमन षण्मुगरत्नम यांची नवी दिल्लीत भेट घेतील. षण्मुगरत्नम राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी चर्चा करतील. राष्ट्रपती मुर्मू त्यांच्या सन्मानार्थ मेजवानी देखील देतील. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत सिंगापूरच्या अध्यक्षांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी सेमीकंडक्टर, औद्योगिक उद्याने, कौशल्य विकास, डिजिटलायझेशन आणि व्यापार विकास या क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केली. डॉ. जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशात सांग...

January 13, 2025 3:49 PM January 13, 2025 3:49 PM

views 10

श्रीनगर – सोनमर्ग रस्त्यावरच्या बोगद्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जम्मू काश्मीर मधल्या सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या बोगद्यामुळे श्रीनगर आणि सोनमर्ग दरम्यान बारमाही रस्ता उपलब्ध होईल. सुमारे साडेसहा किलोमीटर लांबीच्या सोनमर्ग बोगदा प्रकल्पासाठी २ हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला असून हा बोगदा भूस्खलन आणि हिमस्खलनप्रवण रस्ते टाळून लडाखशी अखंड संपर्क निर्माण करणार आहे. यामुळे सोनमर्ग इथं हिवाळी पर्यटन, साहसी खेळांना प्रोत्साहन मिळेल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल. तसंच श्रीनगर आणि लडाख दरम्यान प्रवासाच्या वे...

January 12, 2025 4:05 PM January 12, 2025 4:05 PM

views 16

भारताची पुढची २५ वर्षं कशी असतील,याचा रोडमॅप युवक तयार करत असल्याचे प्रधानमंत्र्यांचे प्रशंसोद्गार

भारताची पुढची २५ वर्षं कशी असतील, याचा रोडमॅप युवक तयार करत आहेत, असे प्रशंसोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज काढले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात युवा नेत्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. स्वामी विवेकानंदांचा सर्वात जास्त विश्वास युवकांवर होता. प्रत्येक समस्येवर युवक उत्तर शोधतील, असा त्यांचा विश्वास होता. त्यावर आपलाही ठाम विश्वास असल्याचं मोदी यांनी सांगितलं.   विकसित भारत युवा न...

January 12, 2025 1:48 PM January 12, 2025 1:48 PM

views 8

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांकडून अभिवादन

स्वामी विवेकानंद यांची आज १६३वी जयंती. अध्यात्मिक गुरु, तत्वज्ञ-विचारवंत आणि भारतीय संस्कृतीचे प्रणेते असलेल्या विवेकानंदांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी केली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. स्वामी विवेकानंद यांनी भारताचा संदेश पाश्चात्य जगापर्यंत पोहोचवला आणि देशवासियांच्या मनात आत्मविश्वास पेरला असं राष्ट्रपती म्हणाल्या. देशाची उभारणी करण्यासाठी, मानवतेची सेवा करण्यासाठ...

January 12, 2025 9:30 AM January 12, 2025 9:30 AM

views 8

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रधानमंत्रींचा तीन हजार युवा नेत्यांसोबत संवाद

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं तीन हजार युवा नेत्यांशी संवाद साधणार आहेत.दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. विकसित भारतासाठी 1 लाख तरुणांना राजकारणात सहभागी करून त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या संवादाचा उद्देश आहे. यावेळी तंत्रज्ञान, शाश्वतता, महिला सक्षमीकरण, उत्पादनं आणि शेती यासारख्या विषयांवर दहा उत्कृष्ट निबंधांच्या पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे.   स्वामी ...

December 15, 2024 1:58 PM December 15, 2024 1:58 PM

views 13

मोल्दोव्हाचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री मिहेल पॉपसॉय भारताच्या दौऱ्यावर

मोल्दोव्हाचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री मिहेल पॉपसॉय हे भारताच्या दौऱ्यावर असून त्यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. पॉपसॉय यांच्या भेटीमुळे भारत-मोल्दोव्हा संबंध अधिक दृढ होतील आणि दोन्ही देशांमधील भागीदारी वाढेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी त्यांचं स्वागत करताना म्हटलं आहे.

December 15, 2024 9:05 AM December 15, 2024 9:05 AM

views 14

भारत लोकशाहीची जननी तर देशाचं संविधान एकतेचा आधार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

देशानं राज्यघटना स्वीकार केल्यापासूनचा प्रवास असाधारण असल्याचं प्रतिपादन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत घटना स्वीकार केल्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दोन दिवसीय चर्चेला उत्तर देताना केलं. आपल्या देशाची प्राचीन लोकशाही विश्वाला दीर्घकाळ प्रेरणा देत राहील. भारत केवळ मोठे लोकशाही राष्ट्र नसून ते लोकशाहीची जननी असल्याचे गौरवोद्वार पंतप्रधानांनी काढले. २०४७ पर्यंत विकसित देशाच्या लक्ष्यपूर्तीत, एकता हे मूल्य महत्त्वाचं असून, आपलं संविधान एकतेचा आधार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. &...