October 1, 2024 3:26 PM October 1, 2024 3:26 PM

views 9

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जमैकाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर उभयपक्षी हिताच्या मुद्द्यांवर चर्चा

प्रधान नरेंद्र मोदी आणि जमैकाचे प्रधानमंत्री डॉ अँड्र्यू हॉलनेस यांच्यात आज नवी दिल्ली इथल्या हैदराबाद हाऊसवर अंतराळ, क्रीडा, जागतिक शांतता, चित्रपट निर्मिती आदी विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली. दोनही प्रधानमंत्र्यांनी चर्चेनंतर संयुक्त निवेदनात या बाबतीत माहिती दिली. कोविड विरोधी लसींच्या मदतीसाठी हॉलनेस यांनी भारताचे आभार मानले. द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी, दोन्ही देशांदरम्यान अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जमैकाचे प्रधानमंत्री आपल्या चार दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत....