January 4, 2025 1:43 PM

views 19

गावखेड्यांचं रूपांतर समृद्धी आणि संधींचं प्रकाशमान केंद्र म्हणून करायला केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

गावखेड्यांचं रूपांतर समृद्धी आणि संधींचं प्रकाशमान केंद्र म्हणून करायला तसंच ग्रामीण भारताला सक्षम करायला केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सवाचं उदघाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. वर्ष २०१४ पासून केंद्र सरकार सातत्यानं ग्रामीण भारताच्या विकासासाठी कार्यरत असून ग्रामीण जनतेला प्रतिष्ठेचं जीवन प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. देशातल्या प्रत्येक गावात सर्व आवश्यक...

January 2, 2025 3:55 PM

views 26

नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांची प्रधानमंत्र्यांकडून प्रशंसा

दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. यामुळे या भागातल्या जीवन सुलभतेला चालना मिळेल, आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, असं त्यांनी समाजमाध्यमवरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. गडचिरोली इथं काल ११ नक्षली अतिरेक्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी गडचिरोलीतल्या नागरिकांचं विशेष अभिनंदन केलं आहे.

December 15, 2024 1:58 PM

views 17

मोल्दोव्हाचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री मिहेल पॉपसॉय भारताच्या दौऱ्यावर

मोल्दोव्हाचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री मिहेल पॉपसॉय हे भारताच्या दौऱ्यावर असून त्यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. पॉपसॉय यांच्या भेटीमुळे भारत-मोल्दोव्हा संबंध अधिक दृढ होतील आणि दोन्ही देशांमधील भागीदारी वाढेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी त्यांचं स्वागत करताना म्हटलं आहे.

December 14, 2024 2:42 PM

views 14

लोकसभेत आज भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षांनिमित्त आयोजित विशेष चर्चासत्रात प्रधानमंत्री सहभागी होणार

लोकसभेत आज भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षांनिमित्त आयोजित विशेष चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सहभागी होणार आहेत. आज चर्चासत्राची सुरुवात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजेजू यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील योगदानाचं त्यांनी यावेळी कौतूक केलं. देशाने स्वातंत्र्यानंतर प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले आहेत. अल्पसंख्याकांसोबत कोणताही भेदभाव केला जात नाही आणि त्यांना कायदेशीर संरक्षण असल्याचं रिजिजू म्हणाले. देशातील सहा अल्पसंख्याक समुदायांच्या कल्याणासा...

December 14, 2024 2:22 PM

views 2

देशातल्या सर्व मुख्य सचिवांची परिषद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु

देशातल्या सर्व मुख्य सचिवांची चौथी राष्ट्रीय परिषद नवी दिल्लीत होत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत. केंद्र आणि राज्यसरकारांमधला ताळमेळ वाढवण्याच्या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून या परिषदेची सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेची संकल्पना उद्योजकता, रोजगार आणि कौशल्यविकासाला प्रोत्साहन – लोकसंख्या समीकरणाचे फायदे अशी आहे. परिषदेला काल प्रारंभ झाला असून आज समान विकास आराखड्यावर राज्यसरकारांच्या सहभागातून काम याविषयावर आज चर्चा होत आहे. सर...

December 14, 2024 9:55 AM

views 8

दिल्ली-डेहराडून द्रुत-गती मार्गाच्या पूर्ण झालेल्या टप्प्याचं पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन होणार – मंत्री नितीन गडकरी

दिल्ली-डेहराडून द्रुत-गती मार्गाच्या पूर्ण झालेल्या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 15 ते 20 दिवसांत उद्घाटन होणार असल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या द्रुतगती महामार्गामुळे दिल्ली डेहराडून या दोन्ही शहरांमधील अंतर अडीच तासांपर्यंत कमी होण्यासाठी मदत होईल असं गडकरी यांनी सांगितलं.

November 17, 2024 3:10 PM

views 16

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नायजेरियामधे हृद्य स्वागत

तीन देशांच्या दौऱ्यामधे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नायजेरियामधे पोहचले असून तिथल्या भारतीय समुदायाने त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. मोदी यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला.नायजेरियात राहणाऱ्या  मराठी भाषक समुदायानं आपल्या मुळांशी आणि मातीशी नातं जपलं असल्याबद्दल मोदी यांनी या समुदायाचं कौतुक केलं. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी समुदायाने आनंद व्यक्त केल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.  नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्याशी ते आज चर्चा क...

November 13, 2024 1:50 PM

views 9

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधल्या विकासप्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधल्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. यामध्ये दरभंगा इथं उभारण्यात येणाऱ्या एम्स संस्थेच्या पायाभरणी समारंभाचा समावेश आहे. या एम्स संस्थेत सुसज्ज आधुनिक रुग्णालयासह आयुष विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, परिचारिका महाविद्यालय आणि निवासी सुविधा असतील. मिथिलांचल भागातल्या नागरिकांचं हे गेल्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न असून पुढच्या तीन वर्षांत ते पूर्ण होईल असं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे. याबरोबरच विविध राष्ट्रीय महामार्ग आणि रे...

October 9, 2024 11:41 AM

views 11

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १० तारखेपासून लाओसमधील व्हिएन्टिनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या, 10 तारखेपासून लाओसमधील व्हिएन्टिनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान मोदी एकविसाव्या आसियान-भारत शिखर परिषदेला आणि 19 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थित राहतील. लाओस आसियानचे विद्यमान अध्यक्ष आहेत. शिखर परिषदेच्या दरम्यान पंतप्रधान काही द्विपक्षीय बैठका घेण्याचीही शक्यता आहे.  

October 8, 2024 2:33 PM

views 28

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वायूसेना दिनानिमित्त भारतीय हवाई दलाला दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वायूसेना दिनानिमित्त भारतीय हवाई दलाला शुभेच्छा दिल्या आहेत. साहस आणि कठोर व्यावसायिक दृष्टिकोन ही हवाई दलाची वैशिष्ट्यं आहेत. आणि देशाच्या संरक्षणामध्ये त्यांनी निभावलेली भूमिका ही अत्यंत कौतुकास्पद आहे, असं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत.