August 2, 2025 8:08 PM August 2, 2025 8:08 PM
2
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रति सरकारच्या वचनबद्धतेचा वस्तुपाठ-प्रधानमंत्री
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रति असलेल्या सरकारच्या वचनबद्धतेचा वस्तुपाठ असून, गेल्या दशकभरात शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यासाठी सरकारने पूर्ण क्षमतेनं काम केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज उत्तरप्रदेशमध्ये वाराणसी इथं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जारी करताना बोलत होते. या हप्त्याअंतर्गत देशभरातल्या ९ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २१ हजार कोटी रुपये थेट हस्तांतरित केले जातील. ...