December 15, 2025 12:41 PM December 15, 2025 12:41 PM
15
प्रधानमंत्री दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जॉर्डनला रवाना
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जॉर्डन, इथीओपिया आणि ओमान या ३ देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. सर्वप्रथम ते जॉर्डनला भेट देतील. या भेटीत ओमानचे राजे अब्दुल्ला द्वितीय इब्न अल हुसेन आणि प्रधानमंत्री जफर हुसेन यांच्याशी परस्परसंबंधाबाबत चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी रवाना होताना सांगितलं. याशिवाय ते जॉर्डनमधल्या भारतीय समुदायाचीही भेट घेणार आहेत. प्रधानमंत्री उद्या इथीओपियाची राजधानी आदीस अबाबा कडे रवाना होतील. प्रधानमंत्री मोदी इथीओपियाच्या प्रधानमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करतील, तसंच तिथल्या सं...