July 4, 2025 9:54 AM July 4, 2025 9:54 AM

views 15

पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये शानदार स्वागत

भारत हा जगभरातील तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप हब असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्ट ऑफ स्पेन इथं काढले. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. तत्पुर्वी विमानतळावर त्यांचे शानदार स्वागत करण्यात आलं. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाचा प्रवास धैर्याचा असून आपले पुर्वज भारतीय संस्कृतीचे वाहक आहेत असंही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच त्रिनिदाद आणि टोबॅगो दौरा आहे आणि 1999 नंतरचा भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे. आपल्या ...

March 29, 2025 7:42 PM March 29, 2025 7:42 PM

views 17

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. रेशीमबागेतल्या स्मृती मंदिरात ते डॉ केशव बळिराम हेडगेवार यांना आदरांजली वाहतील. त्यानंतर दीक्षाभूमीलाही भेट देऊन ते आदरांजली वाहणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या विस्तार केंद्राची पायाभरणी होणार आहे. याठिकाणी ते नागरिकांना संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्री नागपूरमधील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या ड्रोनसाठीच्या धावपट्टी सुविधेचं उ...

March 7, 2025 1:29 PM March 7, 2025 1:29 PM

views 29

२०२७ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार – अमित शाह

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२७ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, याचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दल-CISF च्या ५६ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते जवानांशी बोलत होते. देशातील महत्त्वाच्या संस्थांच्या सुरक्षेत तैनात असलेलं CISF हा राष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा भाग असल्याचंही शाह म्हणाले. CISF च्या महिला तुकडीचंही शाह यांनी कौतुक केलं.

January 15, 2025 7:05 PM January 15, 2025 7:05 PM

views 21

नौदलाच्या २ नौका आणि एका पाणबुडीचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रार्पण

भारत विस्तारवाद नाही, तर विकासवादाच्या दिशेनं काम करत आहे. भारतानं खुल्या, सुरक्षित, समावेशक आणि समृद्ध भारत-प्रशांत क्षेत्राचं नेहमीच समर्थन केलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.  ते आज मुंबईत नौदलाच्या गोदीत सुरत आणि नीलगिरी या युद्धनौका, तसंच वाघशीर ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केल्यानंतर बोलत होते. नौदलाच्या ताफ्यात एकाच वेळी एकापेक्षा अधिक युद्धनौका आणि पाणबुडी समाविष्ट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळं भारताची सुरक्षा आणि प्रगतीला नवीन सामर्थ्य मिळेल अ...