July 19, 2024 3:14 PM July 19, 2024 3:14 PM
7
दुधाला हमी भाव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं कायदा करावा- राधाकृष्ण विखे पाटील
दुधाला हमी भाव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं कायदा करावा, अशी मागणी दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकार मंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. दूध दरातल्या चढ-उताराचा मोठा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन सरकारनं दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी तातडीनं हा निर्णय घ्यावा,अशी विनंती त्यांनी केली आहे.