October 13, 2024 7:24 PM October 13, 2024 7:24 PM

views 13

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा विरोधकांचा आरोप

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. महिलांवर अत्याचार होत आहेत, राजकीय नेते सुरक्षित नाहीत मग जनतेच्या सुरक्षेचं काय? असं म्हणाले.    देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या प्रशासनाचा एक वेगळा दबदबा होता मात्र सध्याच्या सरकारनं हा नावलौकिक धुळीला मिळवला आहे,...