February 15, 2025 5:06 PM February 15, 2025 5:06 PM

views 2

पारंपरिक समुदायांच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष न करण्याचं राष्ट्रपतींचं उद्योजकांना आवाहन

नवउद्योजक आणि व्यावसायिकांनी पारंपरिक समुदायांचं उपजत ज्ञान दुर्लक्षित करता काम नये असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे.   त्या आज झारखंडमध्ये रांची इथं मेसरा इथल्या बिर्ला तंत्रज्ञान संस्थेच्या अमृतमहोत्सव सोहळ्यात बोलत होत्या. ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण यांच्यात झालेल्या अनोख्या बदलांमुळे भविष्यात नाट्यमय परिवर्तन अनुभवायला मिळेल असं त्या म्हणाल्या.   विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवकांचा उत्साह आणि वचनबद्धता महत्वपूर्ण भूमिका निभावत असल्...

January 12, 2025 1:48 PM January 12, 2025 1:48 PM

views 8

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांकडून अभिवादन

स्वामी विवेकानंद यांची आज १६३वी जयंती. अध्यात्मिक गुरु, तत्वज्ञ-विचारवंत आणि भारतीय संस्कृतीचे प्रणेते असलेल्या विवेकानंदांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी केली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. स्वामी विवेकानंद यांनी भारताचा संदेश पाश्चात्य जगापर्यंत पोहोचवला आणि देशवासियांच्या मनात आत्मविश्वास पेरला असं राष्ट्रपती म्हणाल्या. देशाची उभारणी करण्यासाठी, मानवतेची सेवा करण्यासाठ...

December 7, 2024 11:04 AM December 7, 2024 11:04 AM

views 9

मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग-राष्ट्रपतींचं प्रतिपादन

मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल ओडीशातील मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना केलं. केवळ 'रोजगार मिळवण्यासाठी शिक्षण' हे ब्रीद न ठेवता, विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान संपादन केलं पाहिजे असं त्या पुढे म्हणाल्या. मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी काल संवाद साधला. देशातील मुली अधिक मेहनती आहेत आण...

December 4, 2024 1:42 PM December 4, 2024 1:42 PM

views 7

२४ व्या नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाचा आज ओडिशात पुरी इथं राष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम

आज नौदल दिन. १९७१ मध्ये ऑपरेशन ट्रायडेंट दरम्यान भारतीय नौदलानं चार पाकिस्तानी जहाजं बुडवली होती आणि शेकडो पाकिस्तानी नौदलाचे जवान मारले होते. भारतीय नौदलाची ही कामगिरी आणि शौर्याचा आदर करण्यासाठी दरवर्षी चार डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो. भारतीय नौदलाचे शूर जवान अतुलनीय धैर्यानं आणि समर्पणानं देशाच्या समुद्राचं रक्षण करतात त्यांचा आणि नौदलाच्या समृद्ध सागरी इतिहासाचा अभिमान आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून नौदलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय नौदल हे...

October 17, 2024 11:05 AM October 17, 2024 11:05 AM

views 6

राष्ट्रपती आजपासून तीन दिवसांच्या मालावी दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 19 तारखेपर्यंत मालावीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्रपती मालावीमध्ये द्विपक्षीय बैठका घेणार आहेत आणि तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मॉरिटॅनियाचे अध्यक्ष मोहंमद औल्ड घझौनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.   राष्ट्रपतींनी काल शिष्टमंडळ स्तरावरच्या चर्चेतही भाग घेतला. उभय देशांमधले संबंध दृढ करण्यासाठी चार संयुक्त सहकार्य करारांवरही काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय शांतता आ...

October 14, 2024 1:39 PM October 14, 2024 1:39 PM

views 7

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आज अल्जेरियाच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक

  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अल्जेरियाच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. अल्जेरिया-भारत आर्थिक मंचाला संबोधित करणार आहेत. अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मलावी या तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल त्या अल्जेरियाची राजधानी अल्जीयर्स इथं पोहचल्या. अल्जेरियाचे अध्यक्ष अब्देल मादजीद तेब्बौने यांनी त्यांचं स्वागत केलं.   राष्ट्रपतींनी काल अल्जेरियातल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधला. राष्ट्रपती आज आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अल्जेरियातल्या माकम इचाहिद या शहिद स्मारकाल...

October 8, 2024 2:28 PM October 8, 2024 2:28 PM

views 8

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण

७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण होणार आहे. अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना यावेळी दादासाहेब फाळके पुरस्कांरान गौरवण्यात येणार आहे. याबरोबरच चित्रपट निर्मिती आणि अभिनयासाठीच्या इतर पुरस्कांरांचंही वितरण होणार आहे. कन्नड चित्रपट कांतारा मधल्या अभिनयासाठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तमिळ चित्रपट थिरूचित्रमबलमसाठी नित्या मेनन आणि गुजराती चित्रपट कच्छ एक्सप्रेससाठी मानसी पारेख यांना देण्यात येणा...