January 20, 2025 1:05 PM January 20, 2025 1:05 PM
6
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा आज राष्ट्रध्यक्षपदाचा शपथविधी
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज शपथ घेणार आहेत. ते वॉशिंग्टन डीसी इथं अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती पदाची शपथ घेतील. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. सत्तेच्या अधिकृत हस्तांतरणाचा भाग म्हणून ट्रम्प उद्घाटन भाषण देखील करतील. जेडी व्हॅन्स अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतील. शपथविधी सोहळ्याला अनेक परदेशी नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले, इटल...