March 22, 2025 10:06 AM March 22, 2025 10:06 AM
13
एम्सचा 49वा दीक्षांत समारोह सोहळा राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडला
मानसिक आरोग्याशी निगडीत जागरुकता मोहीम राबवून नागरिकांना या सुप्त आजाराची जाणीव करून देण्याचे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी काल दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्सच्या अधिकारी, प्राध्यापकांना केलं. भावनिक आरोग्य हे एक महत्त्वाचे आव्हान झाल्याचे त्या म्हणाल्या. एम्सचा 49 वा दीक्षांत समारोह सोहळा राष्ट्रपतींच्या हस्ते काल पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय आरोग्य कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी एम्सने कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित रोगनिदान आणि यंत्रमान...