August 22, 2024 6:56 PM August 22, 2024 6:56 PM

views 22

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार’ प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात देशातल्या नामवंत शास्त्रज्ञांना २०२४ सालचे  ‘राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार’ प्रदान केले. यामध्ये महाराष्ट्रातल्या ८ शास्त्रज्ञांचा समावेश आहे.  प्रा.  गोविंदराजन पद्मनाभन यांना यावेळी  ‘विज्ञानरत्न २०२४’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मुंबईतल्या भाभा अणु संशोधन केंद्रातले डॉ. आवेश कुमार त्यागी यांना अणुऊर्जा क्षेत्रातल्या विज्ञान श्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. डॉ. आनंदरामकृष्णन यांना कृषी विज्ञान क्षेत्राचा विज्ञान श्...

August 20, 2024 9:45 AM August 20, 2024 9:45 AM

views 10

देशातल्या विविध शाळांमधल्या विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रपतींनी साजरा केला राखीपौर्णिमेचा सण

देशभरातल्या विविध शाळांमधल्या विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी काल राखीपौर्णिमेचा सण साजरा केला. 16 राज्यांमध्ये विविध सरकारी शाळांमधल्या 180 विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. या विद्यार्थ्यांना अमृत उद्यानाची सफर घडवून आणल्याची माहितीही मंत्रालयाने दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल आणि आशीर्वाद दिल्याबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रपती मूर्मू यांचे आभार मानले.

August 11, 2024 8:11 PM August 11, 2024 8:11 PM

views 12

तीन देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच मायदेशी आगमन

फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्ते या तीन देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीत परतल्या. या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासोबतच महत्त्वाच्या मुद्यांबाबत सामंजस्य करार आणि द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तिथल्या भारतीय समुदायाशी जोडणं, हाही या भेटीमागचा उद्देश होता.   न्यूझीलंडमध्ये, दोन्ही देशांमधल्या व्यापार सुलभीकरणाकरता द्विपक्षीय सीमाशुल्क सहकार्य करारावर राष्ट्रपतींच्या या दौऱ्यामध्ये स्वाक्षऱ्या झाल्या. संयुक्त संशोधन आणि विकास...

July 20, 2024 12:18 PM July 20, 2024 12:18 PM

views 14

नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात काल संरक्षण गौरव समारंभ संपन्न

नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात काल संरक्षण गौरव समारंभ संपन्न झाला. या समारंभात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलातील सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 94 विशिष्ट सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात 31 जणांना परम विशिष्ट सेवा पदकं, 4 जणांना उत्तम युद्ध सेवा पदकं, 57 जणांना अति विशिष्ट सेवा पदकं तर दोघांना पुन्हा एकदा अतिविशिष्ट सेवा पदकं बहाल करण्यात आली. या समारंभाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि ...

July 18, 2024 8:13 PM July 18, 2024 8:13 PM

views 20

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडक भाषणांवर “विंग्ज टू अवर होप्स – खंड एक” पुस्तकाचं प्रकाशन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडक भाषणांचं संकलन असलेल्या  "विंग्ज टू अवर होप्स - खंड एक" या पुस्तकाचं आज राष्ट्रपती भवनात प्रकाशन करण्यात आलं.  केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या उपस्थितीत पुस्तकाच्या ई-आवृत्तीसह इंग्रजी आणि हिंदी आवृत्तीचं प्रकाशन केलं.  "कहानी राष्ट्रपती भवन की" आणि "राष्ट्रपती भवन-हेरिटेज मीट्स द प्रेझेंट" या दोन पुस्तकांचंही प्रकाशन यावेळी करण्यात आलं.

July 6, 2024 9:56 AM July 6, 2024 9:56 AM

views 9

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शौर्य पदकांचं वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना 36 शौर्य पुरस्कार प्रदान केले. काल संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आलेल्या शौर्य पुरस्कारांमध्ये 10 कीर्ती चक्र आणि 26 शौर्य चक्रांचा समावेश आहे. यापैकी 7 जवानांना मरणोत्तर कीर्ती चक्र आणि 7 जवानांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आली. अतुलनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि कर्तव्याप्रती निष्ठा दाखविणाऱ्या जवानांना हे पुरस्कार देण्यात आले. ...

June 21, 2024 9:51 AM June 21, 2024 9:51 AM

views 17

लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भर्तृहरी महताब यांची नियुक्ती

भाजपाचे खासदार भर्तृहरी महताब यांची लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केली असल्याची माहिती, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होईपर्यन्त, महताब अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडतील असं रिजिजू यांनी संदेशात म्हंटलं आहे.   सदस्यांना शपथ घेण्याच्या कामी हंगामी अध्यक्षांना मदत करण्यासाठी घटनेच्या कलम 99 अन्वये सुरेश कोडीकुन्नील, टी बालु, राधा मोहन सिंग,...