October 19, 2024 7:59 PM October 19, 2024 7:59 PM

views 6

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकन राष्ट्रातील दौरा आटपून मायदेशी रवाना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकन राष्ट्रातील आपल्या तीन दिवसांचा दौऱा आटपून भारतात परतत आहेत. मलावी विमानतळावर आज त्यांना उपराष्ट्रपती मिशेल बिझवीक यांनी निरोप दिला. यावेळी अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. दिल्लीसाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी मलावीतल्या सांस्कृतिक स्थळांना भेटी दिल्या. अलगेरिया, मोरिटानिया आणि मालावी या तीन देशांच्या दौऱ्यात राष्ट्रपतींनी मालावीचे अध्यक्ष लाजरस चकवेरा यांच्याशी द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. या तीन्ही देशातल्या  भारतीय वंशाच्या नागरिकांशी त्यांनी संवाद स...

October 9, 2024 8:18 PM October 9, 2024 8:18 PM

views 7

आयुर्वेद औषध निर्मिती उद्योगात तरुणांनी सहभाग घेणं गरजेचं – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशभरात पारंपरिक औषधांची उपलब्धता वाढवण्यासाठी आयुर्वेद औषध निर्मिती उद्योगात तरुणांनी सहभाग घेणं गरजेचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या ८व्या वर्धापन दिनानिमित्त त्या नवी दिल्ली इथं बोलत होत्या. आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. देशात चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांची गरज असल्याचंही राष्ट्रपती मुर्मू यावेळी म्हणाल्या.

October 8, 2024 8:33 PM October 8, 2024 8:33 PM

views 8

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान

चित्रपटसृष्टीतल्या सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने आज ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाला. ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपतींनी इतरही कलाकार आणि चित्रपटांना सन्मानित केलं. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि इतर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मिथुन चक्रवर्ती यांचं अभिनं...

September 20, 2024 12:46 PM September 20, 2024 12:46 PM

views 16

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय कृषी संस्थेच्या शताब्दी सोहळ्याचं उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज रांची मधल्या नामकुम इथल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय कृषी संस्थेच्या शताब्दी सोहळ्याचं उद्घाटन केलं. यावेळी राज्यपाल संतोष कुमार गंगवार, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन उपस्थित होते.

September 18, 2024 12:26 PM September 18, 2024 12:26 PM

views 10

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून राजस्थान, मध्यप्रदेश आणि झारखंडच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून राजस्थान, मध्यप्रदेश आणि झारखंडच्या दौऱ्यावर जात आहेत. जयपूरमधल्या मालविय नॅशनल इन्स्टिट्यू ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातल्या पदवीदान समारंभात त्या आज प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांसाठीच्या नव्या वसतीगृहाचंही त्या उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाला राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार आहेत. दुपारी त्या मध्यप्रदेश दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात त्या इंदूर आणि उज्जैन मधल्या विविध कार्यक्रमात स...

September 17, 2024 4:34 PM September 17, 2024 4:34 PM

views 9

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आठव्या भारत जल सप्ताहची सुरुवात

आठव्या भारत जल सप्ताह २०२४ ची सुरुवात आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झाली. आझादी का अमृत महोत्सवाच्या काळात अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली तसंच अनेक जलकुंभांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं, असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. भारतीय धर्मग्रंथात हजारो वर्षांपासून जलसंधारणाचं महत्व सांगितल्याचंही त्या म्हणाल्या.  चार दिवसांच्या या कार्यक्रमात ४० देशातले दोनशे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.  या कार्यक्रमात शंभरहून अधिक दालनं आणि जल क्षेत्रातले स्टार्टअप्स...

September 15, 2024 7:52 PM September 15, 2024 7:52 PM

views 6

राष्ट्रपतींनी मिलाद उन नबीनिमित्त दिल्या शुभेच्छा

देशभरात उद्या साजऱ्या होणाऱ्या मिलाद उन नबीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुस्लीम समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषिद मोहम्मद यांचा जन्मदिवस मिलाद उन नबी म्हणून साजरा केला जातो. पैगंबरांनी प्रत्येकाला प्रेम आणि बंधुत्वाच्या भावनांना बळ देण्यासाठी प्रेरित केलं. त्यांनी समाजात समानता आणि सौहार्द वाढावा यावर भर दिला तसंच, दया, मानवतेचा प्रसार केला, असं सांगून राष्ट्रपतींनी मुस्लीम समुदायाला पवित्र कुराणातली शिकवण आत्मसात करण्याचं आवाहन केलं.

September 11, 2024 8:32 PM September 11, 2024 8:32 PM

views 15

राष्ट्रपतींच्या हस्ते राज्यातल्या आशा बावणे यांच्यासह १५ जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२४ वितरण सोहळा आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १५ जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील आशा बावणे यांचा समावेश आहे.   केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं १९७३ मध्ये राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार देण्यास सुरुवात केली. हे पुरस्कार उल्लेखनीय काम करणाऱ्या परिचारिकांना दिला जातो.

September 1, 2024 3:21 PM September 1, 2024 3:21 PM

views 22

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजाचं आणि बोधचिन्हाचं अनावरण करणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजाचं आणि बोधचिन्हाचं अनावरण करणार आहेत. तसंच जिल्हा न्यायपालिकेच्या समारोप सत्राला देखील त्या संबोधित करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय परिषदेत जिल्हा न्यायव्यवस्था, पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक न्यायालय कक्ष, न्यायिक सुरक्षा, प्रकरण व्यवस्थापन आणि प्रशिक्षण या पाच सत्रांचा समावेश होता. या परिषदेचं उद्घाटन काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. महिलांवरचे अत्याचार आणि मुलांची सुरक्षा ही सम...

August 25, 2024 7:39 PM August 25, 2024 7:39 PM

views 11

श्रीकृष्ण जयंतीच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना तसंच परदेशस्थ भारतीयांना श्रीकृष्ण जयंती अर्थात कृष्णाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान श्रीकृष्णांच्या दैवी आदर्शांची आठवण करुन देणारा हा सण सर्वांना कायम प्रेरणा देत राहील असं मुर्मू यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती  जगदीप धनखड यांनी कृष्णाष्टमीच्या शुभेच्छा देताना म्हटलं आहे की हा दिवस आपल्याला चांगल्याचा वाईटावर विजय आणि इतर उच्च जीवनमूल्यांचं स्मरण करुन देतो.