November 22, 2025 7:56 PM November 22, 2025 7:56 PM

views 14

देश सर्वप्रथम या तत्त्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असलं पाहिजे – राष्ट्रपती

देश सर्वप्रथम या तत्त्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असलं पाहिजे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. आंध्र प्रदेशातल्या पुट्टपार्थी इथं श्री सत्य साईबाबा यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यात्मिक संस्थांनी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावं, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं.   व्यक्तिगत पातळीवर आणि समाज म्हणून वैश्विक शांतीला बळ मिळावं, आणि संपूर्ण मानवतेचं कल्याण व्हावं, यासाठी प्रयत्न करावेत असंही राष्ट्रपती म्हणाल्या. आंध्र प्रदेश...

November 13, 2025 7:03 PM November 13, 2025 7:03 PM

views 30

भारताच्या प्रोजेक्ट चित्ताला बोत्सवानाची  ८ चित्त्यांची देणगी

भारताच्या प्रोजेक्ट चित्ताला बोत्सवानाने  ८ चित्त्यांची देणगी दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गॅबोरोन संरक्षित अरण्यात या  प्रतिकात्मक हस्तांतरणाचा सोहळा झाला. बोत्सवानाचे अध्यक्ष ड्यूमा बोको देखील यावेळी उपस्थित होते. बोत्सवानातल्या घांझी जंगलातून आणलेले हे चित्ते भारतात पोहोचल्यावर त्यांना सुरुवातीला काही काळ विलगीकरणात ठेवलं जाईल. यापूर्वी नामिबियामधून ८ तर दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते आणले आहेत. त्यातले बहुतेक सगळे इथल्या वातावरणाला सरावले आहेत.     राष्ट्रपती द्...

November 12, 2025 7:57 PM November 12, 2025 7:57 PM

views 26

राष्ट्रपतींच्या बोत्सवाना दौऱ्यात दोन्ही देशांमधे आरोग्य सेवा आणि औषध निर्माण सहकार्यासाठी करार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि बोत्सवानाचे अध्यक्ष डुमा गिडॉन बोको यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली. यात दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, शेती, अक्षय्य ऊर्जा, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, संरक्षण आणि डिजिटल तंत्रज्ञान यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. आरोग्य सेवा आणि औषध निर्माण सहकार्यासाठी यावेळी दोन्ही नेत्यांमधे करार करण्यात आला. बोत्सवानाला एआरव्ही औषधं देण्याची घोषणाही यावेळी राष्ट्रपतींनी केली. या करारामुळे आरोग्य सेवेतली समस्या दूर होऊन बोत्सवानाला ...

November 4, 2025 1:21 PM November 4, 2025 1:21 PM

views 18

विद्यार्थ्यांनी शिक्षणाप्रति आस्था ठेवली पाहिजे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

विद्यार्थ्यांनी शिक्षणाप्रति आस्था ठेवली पाहिजे असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी  मुर्मू यांनी केलं आहे. नैनीतालमधे कुमाऊँ विद्यापीठाच्या २०व्या दीक्षांत समारंभाला त्या संबोधित करत होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उत्तराखंड दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नीम करोली बाबांच्या आश्रमात कैंची धामला भेट दिली तसंच  नैनीतालमधे नयना देवी मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली.

November 3, 2025 1:11 PM November 3, 2025 1:11 PM

views 13

उत्तराखंड विधानसभेच्या विशेष अधिवेशनात राष्ट्रपतींचं संबोधन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उत्तराखंड विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आज संबोधित केलं. अनेक प्रयत्नांनंतर उत्तराखंडच्या मानवी विकास निर्देशांकात प्रगती झाल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. राज्याचा साक्षरता दर वाढल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. उत्तराखंडच्या पवित्र भूमीत आध्यात्म आणि शौर्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या.

September 16, 2025 8:55 PM September 16, 2025 8:55 PM

views 18

मॉरिशसच्या प्रधानमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपती मुर्मू यांची भेट

मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांचं स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की भारताच्या शेजारी देशांप्रतिच्या धोरणात मॉरिशसचं स्थान खास आहे. दोन्ही देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असून ते धोरणात्मक भागिदारीत प्रतिबिंबित होत आहेत असं त्या म्हणाल्या. उभय नेत्यांमधे विविध विषयांवर चर्चा झाली.   डॉ. रामगुलाम यांच्या ८ दिवसांच्या भारत दौऱ्याचा आज शेवटचा टप्पा होता. सकाळी त्यांनी राजघाट आणि सदैव अटल इ...

August 15, 2025 9:49 AM August 15, 2025 9:49 AM

views 8

राष्ट्रपतींचं देशवासीयांना संबोधन

युवा, महिला आणि मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या व्यक्ती देशाला अमृत काळात आघाडीवर ठेवतील, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशवासीयांना संबोधित केलं. सामाजिक क्षेत्रातले विविध उपक्रम तसंच समग्र आर्थिक विकासामुळं २०४७ पर्यंत विकसित अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेनं भारत प्रयत्नशील असल्याचं त्या म्हणाल्या. सर्वसामान्यांचं आयुष्य, व्यापार-उद्योग सहज-सोपे व्हावे यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, असं राष्ट्रपतींनी यावेळी नम...

August 14, 2025 8:05 PM August 14, 2025 8:05 PM

views 11

सैन्य दलांतल्या ४०० हून अधिक जणांचा राष्ट्रपतींकडून गौरव

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही सैन्य दलं आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांना १२७ शौर्य पुरस्कार जाहीर केले आणि २९० जणांना विशेष गौरव केला. यात ४ किर्ती चक्रं, १५ वीर चक्रं, १६ शौर्य चक्रं, ६० सेना पदकं, ६ नौसेना पदकं, २६ वायू सेना पदकं, ७ सर्वोत्तम युद्ध सेवा पदकं, ९ उत्तम युद्ध सेवा पदकं आणि २४ युद्ध सेवा पदकांचा समावेश आहे.    लष्करातले कॅप्टन लालरिनावमा सायलो, लेफ्टनंट शशांक तिवारी, लान्स नायक मीनातची सुंदरम आणि शिपाई जंजल प्रवीण प्रभाकर या...

August 14, 2025 8:02 PM August 14, 2025 8:02 PM

views 2

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती दौपदी मुर्मू आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करणार आहेत. हे संबोधन संध्याकाळी सात वाजल्यापासून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केलं जाईल. त्यानंतर या संबोधनाचं इंग्लिश भाषांतर प्रसारित होईल. तर या संबोधनाचं स्थानिक भाषांमधला अनुवाद रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होणार आहे. यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र उद्या संध्याकाळी पावणेसात वाजता प्रसारित होईल.

August 3, 2025 6:21 PM August 3, 2025 6:21 PM

views 16

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. बिहारमधे  मतदारयाद्यांचं सखोल पुनरिक्षण  या मुद्द्यावरुन संसदेत विरोधी पक्ष कामकाज होऊ देत नसल्याबद्दल या भेटीत चर्चा झाल्याचं समजतं. राष्ट्रपती भवनाच्या समाजमाध्यम खात्यावर ही माहिती दिली आहे.