September 5, 2024 7:54 PM September 5, 2024 7:54 PM
11
शिक्षक आणि पालकांनी मुलांना नेहमी महिलांचा आदर करण्याची शिकवण द्यावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
शिक्षक आणि पालकांनी मुलांना नेहमी महिलांचा आदर करण्याची शिकवण दिली पाहिजे, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या विज्ञान भवन इथं देशभरातल्या ८२ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या. नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर अधिक भर देण्यात आला असून त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो, असं सांगताना राष्ट्रपतींनी शिक्षण क्षेत्र सर्वसमावेशक केल्याबद्दल शिक्षकांचं कौतुक केलं. र...