October 18, 2024 10:13 AM October 18, 2024 10:13 AM
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मालावीचे राष्ट्राध्यक्ष लॅझरस चकवेरा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मालावीचे राष्ट्राध्यक्ष लॅझरस चकवेरा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसंच दोन्ही देशांमध्ये विविध मुद्द्यांवर शिष्टमंडळ स्तरावरची चर्चादेखील होणार आहे. राष्ट्रपती मालावीमधल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. दरम्यान, काल संध्याकाळी राष्ट्रपती मुर्मू यांनी मालावीमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. चांगलं काम करत राहा आणि विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सक्रिय योगदान द्या असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.