January 31, 2025 3:14 PM January 31, 2025 3:14 PM

views 16

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या थोर नेत्यांनी दिलेली एकतेची शपथ आठवून आणि देश संरक्षणात प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांकडून प्रेरणा घेऊन  सर्व नागरिकांनी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करत होत्या.   सरकारनं गेल्या १० वर्षात विकास आणि प्रगतीची नवी शिखरं गाठली आहेत, असं त्या म्हणाल्या. शेतकरी, युवक आणि गरिबांच्या हिताला सरकारन...

January 25, 2025 8:14 PM January 25, 2025 8:14 PM

views 6

राज्य घटनेतून मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच देशाला गौरवशाली वाटचाल करणं शक्य -राष्ट्रपती 

आपल्या देशाची गौरवशाली वाटचाल राज्यघटनेतून मिळालेल्या मार्गदर्शनाशिवाय शक्य झाली नसती असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी म्हटले आहे. राष्ट्रपतींनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित केले त्यावेळी त्या बोलत होत्या. भारतीय म्हणून आपली राज्यघटना ही आपल्या सामूहिक अस्मितेचा मूलभूत आधार आहे असे त्या म्हणाल्या.  गेली ७५ वर्षे राज्यघटनेने आपल्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला आहे. बाबासाहेब आंबेडकर, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष, इतर मान्यवर सदस्य, राज्यघटना निर्मितीशी संब...

January 25, 2025 2:49 PM January 25, 2025 2:49 PM

views 14

प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्षांना गार्ड ऑफ ऑनरनं सन्मानित

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यासह देशभर सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. नवी दिलीत कर्तव्य पथ इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या होणार असलेल्या संचलनाची तयारी पूर्ण झाली आहे. संविधान स्वीकृतीची ७५ वी वर्षपूर्ती आणि लोकसहभाग यावर उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये भर देण्यात आला आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियंतो उद्याच्या संचलन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारताच्या सशस्त्र दलांसोबत इंडोनेशियाची १६० सदस्यीय संचलन तुकडी आणि १९० सदस्यी...

December 26, 2024 3:10 PM December 26, 2024 3:10 PM

views 16

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं. कला तसंच संस्कृती, धाडस, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा विविध सात श्रेणींमध्ये १७ बालकांना असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात मुंबईची १३ वर्षीय केया हटकर आणि अमरावतीच्या १७ वर्षीय करिना थापा हिचा समावेश आहे.  केया हटकर, डान्सिंग ऑन माय व्हील्स आणि आय एम पॉसिबल या दोन बेस्टसेलर पुस्तकांची लेखिका आहे. तिला कला आ...

December 23, 2024 8:12 PM December 23, 2024 8:12 PM

views 8

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी संस्थांमधील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे – राष्ट्रपती

वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी संस्थांमधील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत आज संध्याकाळी वर्धमान महावीर वैद्यकीय महाविद्यालय आणि सफदरजंग रुग्णालयाच्या सहाव्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना त्या बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता, एमआरएनए तंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि थ्रीडी बायोप्रिंटिंगमधील प्रयोग वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणार आहेत. संशोधन आणि  नवोपक्रमासाठी वर्धमान महावीर वैद्यकीय ...

December 17, 2024 9:52 AM December 17, 2024 9:52 AM

views 9

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आंध्रप्रदेश आणि तेलंगणाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या आंध्र प्रदेश दौऱ्यादरम्यान, राष्ट्रपती एम्स मंगलागिरीच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील आणि सिकंदराबाद येथील निलयम इथं विविध उपक्रमांची पायाभरणी करतील. राज्यातील मान्यवर, प्रमुख नागरिक आणि शिक्षणतज्ञ यांच्यासाठी निलयम इथं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, सिकंदराबादच्या कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंटला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रेसिडेंस कलर प्रदान करण्यात येणार आहे.

December 10, 2024 8:14 PM December 10, 2024 8:14 PM

views 6

‘देशात गरिबी, भूक निर्मूलन तसंच तरुणांना समान संधी देण्याबाबतीतली धोरणं राबवून भारतानं जगासमोर वस्तुपाठ दिला’

देशात गरिबी आणि भूक निर्मूलन तसंच तरुणांना समान संध देण्याबाबतीतली धोरणं राबवून भारतानं जगासमोर वस्तुपाठ दिला आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. आंतरराष्टीय मानवाधिकार दिवसानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं आयोजित कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या. देशात मानवाधिकारांची योग्य अंमलबजावणी व्हावी, यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं त्या म्हणाल्या. सायबर गुन्हेगारी आणि हवामान बदल. मानवजातीसमोरच्या मोठ्या समस्या असल्याचं त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात म...

December 6, 2024 2:55 PM December 6, 2024 2:55 PM

views 8

न्यायव्यवस्थेनं शिक्षेपेक्षा न्याय देण्यावर भर द्यावा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

न्यायव्यवस्थेनं शिक्षेपेक्षा न्याय देण्यावर भर द्यावा, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. भुवनेश्वर इथं नवीन न्यायालय संकुलाचं उद्घाटन काल राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. गरिबांना अनावश्यक त्रासदायक ठरणारी, न्यायापासून वंचित ठेवणारी आणि खटले सातत्यानं पुढे ढकलण्याची ही व्यवस्था आता बदलायला हवी, असं आवाहन त्यांनी कायदेतज्ज्ञांना केलं. भारतीय न्याय संहितेनं देशातील वसाहतवादी न्यायव्यवस्था संपुष्टात आणली असून त्यामुळे भारतीय दंड संहितेचा अंत झाला आहे. जनतेला पोली...

December 3, 2024 8:59 AM December 3, 2024 8:59 AM

views 13

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरण पुरस्कारांचं वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना यावर्षीचे राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात एकंदर 33 व्यक्ती आणि संस्थांना हे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. दिव्यांग व्यक्तींचं जीवन अधिक समृद्ध व्हावं या उद्देशाने आखण्यात आलेल्या 16 परिवर्तनात्मक उपक्रमांचाही या कार्यक्रमात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या ...

December 2, 2024 2:50 PM December 2, 2024 2:50 PM

views 11

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार वितरण

आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी एकूण २२ व्यक्ती आणि ११ संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. यावेळी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी उपक्रमांचा आरंभ करण्यात येणार आहे. सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन श्रेणीतील वैयक्तिक उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार पूर्ण अंधत...