April 9, 2025 1:52 PM April 9, 2025 1:52 PM

views 12

पोर्तुगालचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्लोव्हाकियात दाखल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगालचा यशस्वी राजकीय दौरा आटोपून आज सकाळी स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं पोहोचल्या. भारताच्या राष्ट्रपतींची स्लोव्हाकियाला २९ वर्षांनंतरची भेट आहे. या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील. स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांचीही त्या भेट घेणार असून स्लोवाकियाच्या संसदेचे अध्यक्ष रिचर्ड रासी यांच्याशीही चर्चा करणार आहेत.  

April 8, 2025 8:08 PM April 8, 2025 8:08 PM

views 12

राष्ट्रपती यांची दुसऱ्या दिवशी आज पोर्तुगालच्या संसदेला भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पोर्तुगाल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज पोर्तुगालच्या संसदेला भेट दिली. तिथं त्यांना पारंपरिक मानवंदना देण्यात आली. सभापती जोस पेद्रो अग्वार ब्रांको यांच्याशी आणि इतर संसद सदस्यांशी त्यांनी सौहार्दपूर्ण चर्चा केली. राष्ट्रपतींनी  चंपालमो फाऊंडेशन आणि राधाकृष्ण मंदिराला भेट दिली. त्यानंतर अलमेडा इथं राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यावर आदरांजली अर्पण केली. पोर्तुगालमधल्या भारतीय समुदायाशी त्यांनी संवाद साधला.     उद्या आणि परवा म्हणजे ९ आणि १० तारखेला राष्ट्...

April 7, 2025 9:16 PM April 7, 2025 9:16 PM

views 9

राष्ट्रपती यांची पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो डी सौसा यांच्याशी चर्चा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष  मार्सेलो रेबेलो डी सौसा यांची भेट घेऊन शिष्टमंडळस्तरीय चर्चा केली. त्यानंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात राष्ट्रपती म्हणाल्या, की भारत आणि पोर्तुगाल दरम्यानचे नाते संबंध ऐतिहासिक असून आता ते अधिक आधुनिक आणि बहुआयामी झाले आहेत. या बैठकी पूर्वी मुर्मू यांनी पोर्तुगालचे राष्ट्रकवी लुई वाझ डी कामोस यांच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. पोर्तुगालचे प्रधानमंत्री लुई मॉन्टेनेग्रो आणि संसदेचे सभापती जोस पेद्रो अग्वार ब्रांको यांचीही...

April 7, 2025 7:02 PM April 7, 2025 7:02 PM

views 21

भारत आणि पोर्तुगाल दरम्यानचे नाते संबंध ऐतिहासिक-राष्ट्रपती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष  मार्सेलो रेबेलो डी सौसा यांची भेट घेऊन शिष्टमंडळस्तरीय चर्चा केली. त्यानंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात राष्ट्रपती म्हणाल्या, की भारत आणि पोर्तुगाल दरम्यानचे नाते संबंध ऐतिहासिक असून आता ते अधिक आधुनिक आणि बहुआयामी झाले आहेत. पोर्तुगालच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर विविध विषयांवर सविस्तर आणि विधायक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. [video width="1280" height="720" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2025/04/RWW8krC...

April 7, 2025 1:27 PM April 7, 2025 1:27 PM

views 11

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आजपासून पोर्तुगाल आणि स्लोव्हाकिया दौरा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगाल आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर असून काल त्या पोर्तुगालमध्ये पोहोचल्या आहेत. पोर्तुगाल दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू पोर्तुगालच्या राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सौसा यांची भेट घेऊन शिष्टमंडळस्तरीय चर्चा करतील. पोर्तुगालचे प्रधानमंत्री लुईस मॉन्टेनेग्रो आणि त्यांच्या संसदेचे प्रमुख जोस पेड्रो अगुइर-ब्रँको यांचीही त्या भेट घेणार आहेत. गेल्या २७ वर्षांमधली भारताच्या राष्ट्रपतींची ही पहिली पोर्तुगाल भेट आहे. या भेटीमुळे भारताच्या पोर्तुगालसोबतच्या संबंधांना नवी चालना मि...

April 6, 2025 6:29 PM April 6, 2025 6:29 PM

views 107

राष्ट्रपती आज पोर्तुगाल आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यासाठी रवाना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पोर्तुगाल आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या आज रात्री उशिरा पोर्तुगालला पोहोचतील. आपल्या पोर्तुगाल दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू पोर्तुलागच्या राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सौसा यांची भेट घेऊन शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करतील. त्या पोर्तुगालचे प्रधानमंत्री लुईस मॉन्टेनेग्रो आणि त्यांच्या राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष जोस पेड्रो अगुइर-ब्रँको यांचीही भेट घेणार आहेत. गेल्या २७ वर्षांमधली भारताच्या राष्ट्रपतींची पहिली पोर्तुगाल भेट...

April 6, 2025 12:37 PM April 6, 2025 12:37 PM

views 10

वक्फ सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजूरी

वक्फ सुधारणा विधेयक २०२५ ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. गेल्या आठवड्यात लोकसभेत २८८ विरुद्ध २३२ मतांनी तर राज्यसभेत १२८ विरुद्ध ९५ मतांनी हे विधेयक मंजूर झालं होतं.  वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात असलेला पारदर्शकतेचा अभाव या नव्या कायद्यामुळे दूर होणार आहे. वक्फच्या नोंदींचं डिजिटायजेशन करणं, वक्फ मालमत्तांचं ऑडिट करणं, मालमत्तेचं सर्वेक्षण पूर्ण करणं हा या विधेयकाचा हेतू आहे. नव्या सुधारणेनुसार वक्फ बोर्डात मुस्लिम समुदायातल्या मागास घटकांना आणि महिलांना प्रतिनिधीत्व दिलं जाईल....

April 5, 2025 8:06 PM April 5, 2025 8:06 PM

views 7

स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक २०२५ वर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक २०२५ वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. परदेशी नागरिकांचा भारत प्रवेश, वास्तव्य आणि स्थलांतर याविषयीचे नियम या विधेयकात आहेत. यापूर्वीचे पारपत्र कायदा १९२०, परदेशी नागरिक नोंदणी कायदा १९३९, तसंच परदेशी नागरिक कायदा १९४६ आणि भारतात स्थलांतर कायदा २००० हे ब्रिटीशकालीन कायदे या नव्या कायद्याने मोडीत काढले आहेत. गेल्या आठवड्यात संसदेने हे विधेयक मंजूर केलं. नवीन कायद्यानुसार बनावट पारपत्र वापरणं किंवा पुरवणं या गुन्ह्यांकरता ७ वर्षं पर्यंत कैद आण...

April 1, 2025 11:13 AM April 1, 2025 11:13 AM

views 12

रिझर्व बँकेच्या ९०व्या वर्षपूर्ती सोहळ्याची राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आज सांगता

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर आहेत. काल संध्याकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं. आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ९०व्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या सांगता समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं वर्षभर देशभरातील नागरिकांसाठी आर्थिक साक्षरतेबाबतचे विविध उपक्रम आयोजित केले होते.  

March 29, 2025 7:32 PM March 29, 2025 7:32 PM

views 13

राष्ट्रपतींचा पर्यावरणप्रति जागरूक आणि संवेदनशील जीवनशैली अंगिकारण्यावर भर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पर्यावरणप्रति जागरूक आणि संवेदनशील जीवनशैली अंगिकारण्यावर भर दिला आहे. जेणेकरून आपलं जीवन केवळ सुरक्षितच नव्हे, तर चैतन्यमय देखील होईल असं त्यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषद २०२५ च्या उदघाटन समारंभात बोलत होत्या. जागरूकता आणि एकत्रित प्रयत्नांच्या आधारावर केलेल्या कृतीमधूनच पर्यावरणाचं रक्षण आणि त्याचा प्रचार शक्य होईल, असं त्या यावेळी म्हणाल्या. येणाऱ्या पिढ्यांना स्वच्छ पर्यावरण उपलब्ध करणं, ही आपली नैतिक जबा...