October 9, 2025 9:55 AM October 9, 2025 9:55 AM

views 48

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात आहेत. त्या उद्या सोमनाथ मंदिरात दर्शन घेतील. तसंच गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन स्थानिक आदिवासी समुदायाशी संवाद साधणार आहेत. शनिवारी त्या द्वारकेमध्ये द्वारकाधीश मंदिराला भेट देणार असून, त्यानंतर गुजरात विद्यापीठाच्या 71व्या पदवी प्रदान समारंभाला उपस्थित राहाणार आहेत.

October 2, 2025 9:21 AM October 2, 2025 9:21 AM

views 75

देशभरात विजयादशमीचा उत्साह, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना 121 व्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना 156 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. समाजमाध्यमावरून दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी, लाल बहादूर शास्त्री यांच्या सचोटी, नम्रता आणि दृढनिश्चयाने आव्हानात्मक काळात राष्ट्राला बळकटी मिळाल्याचं नमूद केलं. तर ज्यांच्या आदर्शांमुळे मानवी इतिहासाचा मार्ग बदलला अशा असाधारण जीवनाला आदरांजली वाहण्याची संधी म्हणजे गांधी जयंती. गांधीजींच्या विचारसरणीचा गौरव करताना, धैर्य आण...

August 1, 2025 10:04 AM August 1, 2025 10:04 AM

views 6

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज झारखंडच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झारखंडच्या दौऱ्यावर आहेत. आज त्या भारतीय तंत्रज्ञान संस्था-भारतीय खनिकर्म विद्यालयाच्या ४५व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या संस्थेच्या अटल नावोन्मेश केंद्रामध्ये भरवण्यात आलेल्या प्रदर्शनालाही राष्ट्रपती भेट देतील. दीक्षांत सोहळ्यात पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी के मिश्रा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते डॉक्टतर ऑफ सायन्सनं सन्मानित केलं जाणार आहे.

July 4, 2025 2:31 PM July 4, 2025 2:31 PM

views 11

भारतात खेळ हे कायमच राष्ट्रीय एकात्मतेचं एक सामर्थ्यशाली माध्यम असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन

खेळामुळे शिस्त, दृढनिश्चय आणि सांघिक भावना वाढते, खेळात लोक, विविध प्रदेश आणि देशांना जोडण्याची अद्वितीय शक्ती असते असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं ड्युरँड चषक २०२५ या फुटबॉल स्पर्धेच्या चषकांचं अनावरण झालं. त्यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधितही केलं. भारतात खेळ हे कायमच राष्ट्रीय एकात्मतेचं एक सामर्थ्यशाली माध्यम राहिलं असल्याचं त्या म्हणाल्या. फुटबॉल हा रणनीती, सहनशीलता आणि परस्पर सामाईक ध्येयासाठी सांघिक भावनेचं ...

June 20, 2025 2:40 PM June 20, 2025 2:40 PM

views 28

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती निकेतनमधल्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज डेहराडूनमध्ये राष्ट्रपती निकेतन आणि राष्ट्रपती तपोवनचं उद्घाटन केलं. तसंच राष्ट्रपती निकेतनमधल्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि राष्ट्रपती उद्यानाची पायाभरणी ही राष्ट्रपती मुर्मू यांनी केली. राष्ट्रपती उद्यान ही बाग १३२ एकरवर विकसित केली जाणार आहे. राष्ट्रपती निकेतन आणि तपोवन येत्या २४ तारखेपासून जनतेसाठी खुले होणार आहेत. या वेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय दृष्टिहीन दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण संस्थेच्या विद्यार्थ्यांनाही संबोधित केलं.

May 28, 2025 8:03 PM May 28, 2025 8:03 PM

views 11

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन करतील. साहित्य अकादमीच्या सहकार्याने राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रामध्ये  या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह देशभरातून प्रसिद्ध साहित्यिक उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.     या संमेलनामध्ये भारतातील स्त्रीवादी साहित्य, साहित्यातील बदल विरुद्ध बदललेलं साहित्य आणि जागतिक दृष्टिकोनातून भारतीय साहित्याच्या नवीन दिशा, कवी संमेलनासह विविध सत्रं सादर होतील...

May 15, 2025 1:34 PM May 15, 2025 1:34 PM

views 15

राज्यपालांना समयसीमा देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का? राष्ट्रपतींची विचारणा

राज्यविधीमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांवर कृती करण्यासाठी राज्यपालांना समयसीमा  देण्याचा  अधिकार न्यायालयाला आहे का अशी विचारणा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांनी केली आहे. तमिळनाडू विधानसभेने मंजूर केलेली विधेयकं राज्यपालांकडे दीर्घ काळ प्रलंबित राहिल्याप्रकरणी  दिलेल्या निवाड्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की विशिष्ट कालावधीत राज्यपालांनी विधेयकांवर निर्णय घेतला पाहिजे. मुदत न पाळल्यास राज्यपालांची संमती गृहीत धरण्यात यावी असंही न्यायालयाने म्हटलं आहे.    त्यासंदर्भात १४ वेगवेगळे प्र...

May 14, 2025 3:32 PM May 14, 2025 3:32 PM

views 18

देशाच्या तिन्ही संरक्षण दलांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

देशाच्या तिन्ही संरक्षण दलांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. संरक्षणदल  प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाईदल प्रमुख एअरचीफ मार्शल ए.पी. सिंग, आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी राष्ट्रपतींना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. दहशतवादाचा मुकाबला करताना सेनादलांनी दाखवलेल्या समर्पण आणि शौर्याचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं.

May 2, 2025 3:28 PM May 2, 2025 3:28 PM

views 16

ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबातले महत्वाचे घटक – राष्ट्रपती

ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबातले  महत्वाचे घटक तसंच कुटुंबियांचे भावनिक आधारस्तंभ असतात, ज्येष्ठ नागरिकांनी केलेलं मार्गदर्शन समाजासाठीही  महत्वाचं असतं, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित एका ज्येष्ठ नागरिक सोहळ्यादरम्यान म्हणाल्या. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रपतींनी राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत काही उपयुक्त  साहित्य भेट म्हणून दिलं. ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, आरोग्य तसंच राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाय-योजनांबाबत राष्...

April 25, 2025 8:19 PM April 25, 2025 8:19 PM

views 10

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व्हॅटिकन सिटीमध्ये पोहोचल्या

पोप फ्रान्सिस यांच्यावर उद्या व्हॅटिकन सिटीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या देशभरात दुखवटा पाळण्यात येणार आहे.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यासाठी आज व्हॅटिकन सिटीमध्ये पोहोचल्या आहेत. त्यांच्यासोबत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि गोवा विधानसभेचे उपसभापती जोशुआ डीसूझा आहेत. राष्ट्रपती मुर्मू  उद्या सेंट पीटरच्या बॅसिलिका येथे पुष्पहार अर्पण करून पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहून अंत्यसंस्कारात सहभागी होतील, असं परराष...