December 29, 2025 1:31 PM December 29, 2025 1:31 PM
4
ओल चिकी लिपीच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या झारखंड दौऱ्यावर आहेत. आज त्या जमशेदपूर इथं ओल चिकी लिपीच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात सहभागी झाल्या. संथाली भाषेसाठी पंडित रघुनाथ मुर्मू यांनी सुरू केलेल्या 'ओल चिकी' चळवळीला १०० वर्ष झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जमशेदपूरच्या १५ व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती उद्या मुर्मू गुमला इथं आंतरराज्यीय जनसांस्कृतिक समारंभाला भेट देतील.