November 9, 2025 6:56 PM November 9, 2025 6:56 PM

views 28

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची अंगोलाच्या अध्यक्षांबरोबर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लॉरेन्सो यांच्याशी भारत आणि अंगोला यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी दोन्ही देशांच्या सामाईक हिताच्या विविध क्षेत्रांमधलं सहकार्य वाढवण्यावर भर दिला. उत्तम संसदीय कार्यपद्धती, कृषी, विशेषतः बियाणं आणि खतं, तेलसाठ्यांचा शोध आणि शुद्धीकरण, दळणवळणाच्या पायाभूत सुविधा, दुर्मिळ खनिजं आणि हिऱ्यावर प्रक्रिया या क्षेत्रांकडे त्यांनी लक्ष वेधलं. या क्षेत्रांमध्ये अंगोलाबरोबर काम कर...

November 8, 2025 1:27 PM November 8, 2025 1:27 PM

views 28

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून अंगोला आणि बोत्सवाना या 2 देशांच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अंगोला आणि बोत्सवाना या 2 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भेटीच्या पहिल्या टप्प्यात त्या अंगोलाच्या अध्यक्षांच्या निमंत्रणावरून अंगोला देशाला भेट देतील. अंगोलाच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील. तिथल्या भारतीय समुदायाशीही त्या संवाद साधणार आहेत.   त्यानंतर 11 नोव्हेंबरला त्या बोत्सवानाला जातील. त्या बोत्स्वानाच्या अध्यक्षांबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच तिथल्या संसदेला संबोधित करतील.  

November 7, 2025 2:24 PM November 7, 2025 2:24 PM

views 21

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा वंदे मातरम् गीताला अभिवादन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त अभिवादन केलं आहे. स्वातंत्र्यसमराच्या काळात ब्रिटिशांच्या विरोधात सन्यांशांनी पुकारलेल्या बंडाच्या वेळी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी या अमर गीताची रचना केली होती, असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. हे गीत आजही सर्व भारतीयांना एका सूत्रात बांधून ठेवण्याचं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. यानिमित्तानं सर्व नागरिकांनी भारतमातेच्या समृद्धीसाठी काम करण्याचा संकल्प करावा, असं आवाहन त्यांनी के...

November 2, 2025 8:27 PM November 2, 2025 8:27 PM

views 25

राष्ट्रपतींच्या हस्ते उत्तराखंडमधे पादचारी पुलाचं उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज उत्तराखंडमधे देहरादून इथं पादचारी पुलाचं उद्घाटन केलं. यावेळी राज्यपाल गुरमीत सिंग आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ‘राष्ट्रपती निकेतन’ मधे आयोजित आंतरराष्ट्री साहित्य, संस्कृती आणि कला महोत्सवाला संबोधित करतील.

October 13, 2025 6:30 PM October 13, 2025 6:30 PM

views 22

मोंगोलियाचे अध्यक्ष खुलेरसुख उखना नवी दिल्लीत पोहचले

मोंगोलियाचे अध्यक्ष खुलेरसुख उखना यांचं ४ दिवसांच्या भारतभेटीसाठी आज नवी दिल्लीत आगमन झालं. केंद्रीय हवाई वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्याचं विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर त्यांना परंपरिक मानवंदना देण्यात आली. या दौऱ्यात उखना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असून उद्या ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. मोंगोलियाचे अध्यक्ष या नात्याने उखना प्रथमच भारतात आले आहेत.  उभयपक्षी हिताच्या मुद्द्यांवर ते विविध नेत्यांशी चर्चा करतील. 

June 27, 2025 3:54 PM June 27, 2025 3:54 PM

views 13

देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था मजबूत असणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रपतींचं प्रतिपादन

देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी मजबूत MSME अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय MSME दिनाच्या कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या. MSME क्षेत्र देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या. MSME क्षेत्र ग्रामीण आणि मागासलेल्या भागात रोजगाराच्या संधी निर्माण करत असल्याचं त्यांनी म्हटलं. MSME क्षेत्र हे शेतीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचं रोजगार निर्माण करणारं क्षेत्र असल्याचं ...

April 15, 2025 3:36 PM April 15, 2025 3:36 PM

views 14

भारतीय प्रशासन सेवेच्या २०२३ साली निवड झालेल्या सनदी अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपतींची घेतली भेट

भारतीय प्रशासन सेवेच्या २०२३ साली निवड झालेल्या सनदी अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर चालवलेल्या समाजकल्याण आणि विकासकामांमुळे राष्ट्रीय उद्दिष्टपूर्तीत मोठी मदत होत असते. अधिकाऱ्यांनी आपले हक्क आणि कर्तव्य यांच्यात समतोल साधून हक्कांचा वापर जबाबदारी पार पाडण्यासाठी करावा असा सल्ला राष्ट्रपती मुर्मू यांनी अधिकाऱ्यांना दिला.

April 11, 2025 9:05 AM April 11, 2025 9:05 AM

views 13

स्लोवाकिया आणि भारतादरम्यान व्यापारासंदर्भात नव्या संधी असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

स्लोवाकिया आणि भारतादरम्यान विकास आणि विविध क्षेत्रातील सहकार्याची मोठी संधी असल्याचं राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी काल ब्रातिस्लावा इथं सांगितलं. स्लोवाक-भारत व्यावसायिक परिषदेचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.   व्यावसायिक संधींना खऱ्या सहकार्यात रूपांतरित करण्यासाठी हा मंच एक महत्त्वाची संधी असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून नजीकच्या भविष्यात जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी आणि 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांन...

March 22, 2025 1:33 PM March 22, 2025 1:33 PM

views 23

बिहारच्या स्थापना दिनानिमित्त बिहारवासीयांना प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या स्थापना दिनानिमित्त बिहारवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. बिहार ही प्राचीन काळापासून ज्ञान आणि विकासाची भूमी असल्याचं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. बिहारचे नागरिक त्यांची प्रतिभा, निश्चय आणि कष्ट यातून विकसित बिहारसाठी आणि पर्यायाने समृद्ध भारतासाठी भरीव योगदान देत राहतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिहारचं वर्णन दिग्गज व्यक्तिमत्त्वांची पवित्र भूमी असं केलं आ...

March 11, 2025 2:55 PM March 11, 2025 2:55 PM

views 6

पंजाबच्या केंद्रीय विद्यापीठात केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील संस्कृतींचा मिलाफ दिसून येतो- राष्ट्रपती

पंजाबच्या केंद्रीय विद्यापीठात केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील संस्कृतींचा मिलाफ दिसून येतो आणि इथल्या विद्यार्थी तसंच शिक्षकांमध्ये भारतातल्या विविधतेच प्रतिबिंब उमटलेलं दिसतं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. पंजाबातल्या बठिंडा विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभात त्या आज बोलत होत्या.   बठिंडा इथून जवळ असलेल्या तलवंडी इथल्या तखत श्री दमदमा साहिब इथे गुरु नानकांनी त्यांच्या संघर्षमय जीवनातला काही काळ घालवला होता, अशा महत्वाच्या स्थानामधील अध्यात्मिक ऊर्जा आणि वीररस इथेह...