February 15, 2025 1:17 PM February 15, 2025 1:17 PM

views 12

प्रयागराजमध्ये रस्ते अपघातात १० जणांचा मृत्यू, १९ जण जखमी

प्रयागराज जिल्ह्यात कार आणि बसची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकूण १९ जण जखमी झाले आहेत. छत्तीसगड राज्यातल्या कोरबा इथून प्रयागराज कडे जाणारी गाडी प्रयागराजहून वाराणसीकडे जाणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाल्याचं प्रयागराजचे पोलीस आयुक्त तरुण गाबा यांनी सांगितलं.   राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अपघातात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं, अशी सदिच्छा समाज माध्यमांवर व्यक्त केली आहे. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत...

February 3, 2025 5:28 PM February 3, 2025 5:28 PM

views 3

महाकुंभ दरम्यान चेंगराचेंगरीप्रकरणी जनहित याचिका दाखल करुन घ्यायला सर्वोच्च न्यायलयाचा नकार

उत्तरप्रदेशात महाकुंभ दरम्यान चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जनहित याचिका दाखल करुन घ्यायला सर्वोच्च न्यायलयाने नकार दिला आहे. या ढिसाळ व्यवस्थापनासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर आली होती. हा सारा प्रकार चिंताजनक आहे मात्र याचिकाकर्त्याने या संदर्भात प्रथम अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे दाद मागावी असं न्यायलयाने सांगितलं.

January 31, 2025 3:12 PM January 31, 2025 3:12 PM

views 13

प्रयागराज दुर्घटना : न्यायलयीन आयोगाची संगम घाटाला भेट

प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात नुकत्याच झालेल्या चेंगराचेगरीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेला न्यायालयीन आयोग आज संगम घाटाला भेट देत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती हर्ष कुमार यांच्या नेतृत्वाखाली हा त्रिसदस्यीय आयोग राज्यसरकारने स्थापन केला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंग आणि महासंचालक प्रशांत कुमार यांनी काल संगमस्थळाला भेट दिली.   पुढील अमृतस्नानाच्या दिवशी प्रशासनानं सुरक्षा यंत्रणांचं नियोजन चोख करावं, गर्दीच्या ठिकाणी जास्तीत जास्...

January 30, 2025 7:39 PM January 30, 2025 7:39 PM

views 7

प्रयागराज दुर्घटनेच्या चौकशीसाठी तीनजणांची न्यायिक समिती गठीत

प्रयागराज महाकुंभ इथं असलेल्या संगम घाटाला आज उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार आणि पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी आज भेट दिली. काल चेंगराचेंगरी झालेल्या दुर्घटना स्थळाला त्यांंनी भेट दिली. जखमींवर उपचार सुरु आहेत त्या स्वरुपरानी नेहरु रुग्णालयालाही त्यांनी भेट दिली. संगमाजवळ आखाडा मार्गावर काल झालेल्या चेंगराचेगरीत तीसजण ठार झाले होते. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी उत्तरप्रदेश सरकारने तीनजणांची न्यायिक समिती गठीत केली आहे. या समितीचे सदस्यही उद्या महाकुंभमेळ्याच्या स्थळाला भेट देतील.  

January 14, 2025 3:21 PM January 14, 2025 3:21 PM

views 15

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं प्रयागराज इथं निधन

सोलापूर महापालिकेचे माजी महापाैर महेश विष्णूपंत काेठे यांचं आज सकाळी उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते साठ वर्षांचे होते. कोठे प्रयागराज इथं कुंभमेळ्याला गेले होते. आज सकाळी स्नान करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. साेलापूर महापालिकेच्या राजकारणावर वर्चस्व असलेला नेता अशी महेश काेठे यांची ओळख हाेती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते असणाऱ्या महेश कोठे यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली हाेती. 

December 14, 2024 9:22 AM December 14, 2024 9:22 AM

views 10

प्रयागराज इथे 6 हजार 670 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

महाकुंभ 2025 हा एकता-समतेचा महायज्ञ ठरेल, देशाला मार्गदर्शन करेल आणि त्याची सर्वत्र चर्चा होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 13 जानेवारी 2025 पासून अधिकृतपणे सुरू होणाऱ्या महाकुंभ-2025 चं औपचारिक उद्घाटन केल्यानंतर ते प्रयागराज संगम परिसरात एका मेळाव्यात बोलत होते. या प्रसंगी, त्यांनी सुमारे 6 हजार 670 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला, यात प्रयागराजमधल्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि अखंड संपर्क प्रस्थापित करण्यासाठी अनेक रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचा समावेश...

July 14, 2024 5:59 PM July 14, 2024 5:59 PM

views 9

‘हमारा संविधान हमारा सन्मान’चा स्तरावरील दुसरा कार्यक्रम येत्या मंगळवारी प्रयागराज इथं होणार

केंद्रीय विधि आणि न्याय मंत्रालयाच्या वतीनं 'हमारा संविधान हमारा सन्मान' या उपक्रमाच्या प्रादेशिक स्तरावरील दुसरा कार्यक्रम येत्या १६ जुलै २०२४ रोजी उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं होणार आहे. भारतीय राज्यघटना आणि भारताचा प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केल्याच्या घटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम होईल. यावेळी 'हमारा संविधान हमारा सन्मान' या पोर्टलचा प्रारंभही केला जाईल, तसंच मायगव्ह या डिजीटल व्यासपीठावरून जानेवारी ते एप्रिल या कालावधीत झालेल्या संविधान विषयक प्रश्नमंजुषा, पंच प्रण...