September 6, 2024 8:23 PM September 6, 2024 8:23 PM
42
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमारला उंच उडी प्रकारात सुवर्णपदक
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज भारताच्या प्रवीण कुमारनं पुरुषांच्या उंच उडी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. त्यानं २ मीटर ८ सेंटीमीटर उंच उडी मारली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल प्रवीण कुमारचं अभिनंदन केलं आहे. याबरोबरच भारताची पदकसंख्या २६वर गेली आहे. यात ६ सुवर्ण, ९ रौप्य आणि ११ कास्यपदकांचा समावेश आहे. पावर लिफ्टिंगमध्ये कस्तुरी राजमणी महिलांच्या ६७ किलो वजनी गटात आज मैदानात उतरेल. भावनाबेन अजबजी चौधरी महिलांच्या भालाफेकीत, तर ...