January 10, 2025 1:15 PM January 10, 2025 1:15 PM

views 3

‘लिंगभाव समानता आणि महिला सबलीकरण हे भारताच्या परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अविभाज्य घटक’

लिंगभाव समानता आणि महिला सबलीकरण हे भारताच्या परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अविभाज्य घटक असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी आज केलं. भुवनेश्वरमध्ये सुरू असलेल्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या चौथ्या दिवसाच्या अध्यक्षपदाच्या भाषणात ते बोलत होते. डायस्पोरा दिवस - महिलांचं नेतृत्व आणि प्रभाव या संकल्पनेवर आधारित सत्राला संबोधित करताना जयशंकर म्हणाले की, सामाजिक रचनेत लिंगावर आधारित भेदभाव हा कौटुंबिक स्तरावर सुरू होतो आणि त्याचे पडसाद आरोग्य, पोषण आणि शिक्षण ...

January 9, 2025 8:04 PM January 9, 2025 8:04 PM

views 7

नेपाळमध्ये काठमांडू इथं ‘प्रवासी भारतीय दिन’ साजरा

नेपाळमध्ये काठमांडू इथं आज ‘प्रवासी भारतीय दिन’ साजरा करण्यात आला. नेपाळमधल्या भारतीय दूतावास आणि भारतीय नागरिक संस्थेतर्फे त्याचं  आयोजन करण्यात आलं होतं . यावेळी भारतीय नागरिक संस्थेचे अध्यक्ष मनोज कांदोई यांनी नेपाळच्या प्रगतीमध्ये भारतीय नागरिकांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. नेपाळमधले भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव आणि मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक यावेळी उपस्थित होते. 

January 8, 2025 8:20 PM January 8, 2025 8:20 PM

views 7

१८व्या ‘प्रवासी भारतीय दिवस’ अधिवेशनाला भुवनेश्वर इथं सुरुवात

भारत देश एक आधुनिक, सर्वसमावेशक आणि प्रगतीशील समाज निर्माण करण्यासाठी दीर्घकालीन आव्हानांचा सामना करत सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून यशस्वीपणे प्रवास करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलं आहे. १८ व्या ‘प्रवासी भारतीय दिवस’ अधिवेशनाला आज सकाळी ओडिशात भुवनेश्वर इथं सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. ‘विकसित भारतासाठी प्रवासी भारतीयांचं योगदान’ ही यंदाच्या अधिवेशनाची संकल्पना आहे.  या अधिवेशनात ७५ देशांमधले सहा हजारापेक्षा जास्त अनिवासी भारतीय सहभागी होत आहेत....