December 13, 2024 8:07 PM December 13, 2024 8:07 PM

views 11

देशात अवयव दानासह उती दानाचं तसंच अवयव प्रत्यारोपणाचं प्रमाण वाढलं – राज्यमंत्री प्रतापराव जाधव

देशभरात राबवलेल्या  जनजागृती मोहिमांमुळं देशात अवयव दानासह उती दानाचं तसंच अवयव प्रत्यारोपणाचं प्रमाण वाढलं असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाचं लेखी उत्तर देताना सांगितलं. २०१८ दरम्यान असलेली ६ हजार २९४ इतकी असलेली अवयव दात्यांची संख्या २०२३ पर्यंत १६ हजार ५४२ पर्यंत पोचली आहे. या कालावधीत अवयव प्रत्यारोपणाची संख्या  ७ हजाराहून १८ हजारापर्यंत वाढली आहे. 

October 9, 2024 6:47 PM October 9, 2024 6:47 PM

views 12

नागरिकांना मिळणारं आरोग्य कवच ५ लाख रुपयांपर्यंत वाढलं – मंत्री प्रतापराव जाधव

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मिळणारं आरोग्य कवच आता प्रति कुटुंब प्रति वर्ष दीड लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढलं आहे असं केंद्रीय आयुष आरोग्य आणि  कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली ‘आयुष्मान संवाद’ हा आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीचा कार्यक्रम नुकताच बुलढाण्यात झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात दोन कोटी ८५ लाख लाभार्थींनी आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेतला. तर बुलढाणा जिल्ह्यात ७ लाख  २३ हजा...

October 8, 2024 5:31 PM October 8, 2024 5:31 PM

views 11

तळागाळातल्या नागरिकापर्यंत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार वचनबद्ध – मंत्री प्रतापराव जाधव

तळागाळातल्या नागरिकापर्यंत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं. नागपूर इथं एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातल्या आरोग्य सुविधांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवणं ही सरकारची प्राथमिकता आहे, असंही जाधव म्हणाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी सं...

October 1, 2024 6:51 PM October 1, 2024 6:51 PM

views 10

राज्यातल्या ८ वैद्यकीय महाविद्यालयांना राष्ट्रीय आरोग्य विज्ञान विभागाची मान्यता

राज्यातल्या एकूण आठ वैद्यकीय महाविद्यालयांना अटी आणि शर्तीच्या अधीन राहून राष्ट्रीय आरोग्य विज्ञान विभागानं मान्यता दिली असून, याच सत्रापासून ही आठही महाविद्यालयं सुरू होणार आहेत. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बुलढाणा इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.   या आठ वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रत्येकी १०० याप्रमाणे ८०० वैद्यकीय प्रवेशांमुळे देशातली एकूण प्रवेश संख्या एक लाख १६ हजार ६१२ एवढी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या दहा वर्षात वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ब...

September 10, 2024 12:55 PM September 10, 2024 12:55 PM

views 11

प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं आवाहन

मृत्यूनंतर केलेलं अवयवदान हे अनेकांसाठी जीवदान ठरू शकतं, त्यामुळे प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा, असं आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या अवयवदान जनजागृती सोहळ्यात ते बोलत होते. अकोला जिल्ह्यातल्या १६ हजार नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला असून हा एक विक्रम असल्याचं जाधव म्हणाले. या सोहळ्यात उपस्थितांनी अवयवदान करण्याची शपथ घेतली. तसंच अवयवदानाचा संकल्प घेतलेल्यांचा कृतज्ञता पत्र देऊन सन्मा...

September 6, 2024 1:21 PM September 6, 2024 1:21 PM

views 11

आयुष मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या वैद्यकशाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आता नॅशनल एक्झिट टेस्ट अनिवार्य

आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी शाखांमध्ये 2021-22 पासून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नॅशनल एक्झिट टेस्ट अर्थात एन ई एक्स टी देणं अनिवार्य असणार आहे अशी घोषणा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल केली. या संदर्भात विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करण्याच्या दृष्टीनं स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमध्यमांशी बोलताना सांगितलं. एक वर्षांची आंतरवासिता अर्थात इंटर्नशीप पूर्ण केल्यानंतर राज्य अथवा राष्ट्रीय स्तरावर परव...

August 31, 2024 8:07 PM August 31, 2024 8:07 PM

views 16

येत्या पाच वर्षांत १० आयुष संस्था उभारण्यात येणार – आयुषमंत्री प्रतापराव जाधव

प्रत्येक घराघरांत आयुर्वेद पोहोचवण्याची प्रधानमंत्र्यांची संकल्पना पूर्ण करण्यासाठी आयुष मंत्रालय कटिबद्ध असून येत्या पाच वर्षांत १० आयुष संस्था उभारण्यात येणार असल्याचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीतल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद इथं झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.