April 11, 2025 3:31 PM April 11, 2025 3:31 PM

views 9

एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारला

एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पदभार स्वीकारला. ही जबाबदारी दिल्याबद्दल सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले.   सार्वजनिक सेवेत काम करताना जनतेचा विश्वास हीच खरी ताकद मानून पुढे जाण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आता ही नवी भूमिका पार पाडताना देखील प्रवाशांच्या हिताचा विचार सर्वात अग्रक्रमावर असेल, अशी ग्वाही सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशातून दिली.

April 10, 2025 7:12 PM April 10, 2025 7:12 PM

views 65

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती

राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते एसटी महामंडळाचे २६ वे अध्यक्ष आहेत. एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवाशांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.   पालघरमध्ये लवकरच नवं प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येईल अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केली आहे. पालघर विभागातल्या ८ आगारांना प्रत्येकी ५ नवीन एसटी बस देण्यात येत असल्याच...

January 14, 2025 6:10 PM January 14, 2025 6:10 PM

views 9

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीत आणणार -प्रताप सरनाईक

खासगी पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावली अंतर्गत आणणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या संदर्भात आज मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.  प्रवासी सुरक्षा, कार पुलिंग, परवाना, ट्रॅफिक समस्या या संदर्भातली पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी दिले आहेत. सर्व प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांअतर्गत चारचाकी, बाईक, टॅक्सी यांचा समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती देतानाच प्रवासी...

January 7, 2025 7:57 PM January 7, 2025 7:57 PM

views 7

मुंबईत रोपवेच्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवायला तत्वतः मान्यता

मुंबई महानगर क्षेत्रात रोप वे च्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवायला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. लवकरच या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार केला जाईल. तसे निर्देश गडकरी यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव  वी. उमाशंकर यांना दिले आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.    नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली इथं सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकी दरम्यान सरनाईक यांनी गडकरी यांची विशे...

January 6, 2025 8:25 PM January 6, 2025 8:25 PM

views 14

भविष्यात ‘केबल कार’ सेवा विकसित करण्याची गरज-प्रताप सरनाईक

रस्ते वाहतूक, रेल्वे, तसंच मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवरचा वाढता ताण लक्षात घेता भविष्यात ‘केबल कार’ सेवा विकसित करण्याची गरज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करणं गरजेचं आहे. मुंबई महानगर क्षेत्रात `‘केबल कार’ प्रकल्प राबवण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी, अथवा केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक भागिदारीनं रोप वे विकसित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.    उद्या नवी दिल्ली इथं होणाऱ्या ‘विकसित भारत २०४७’ ...