April 11, 2025 7:38 PM April 11, 2025 7:38 PM

views 7

प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देणारा प्रशांत कोरटकर याची कळंबा कारागृहातून आज सुटका झाली. न्यायालयानं अटी-शर्तीसह ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोरटकरचा जामीन मंजूर केला होता. मात्र कागदपत्रांची पुर्तता न झाल्यानं त्याचा कारागृहातील दोन दिवस मुक्काम वाढला होता. अखेर आज कडक पोलिस बंदोबस्त आणि गुप्तता पाळून त्याला कारागृहाबाहेर आणण्यात आलं. त्यानंतर विमानानं कोरटकर मुंबईला रवाना झाला.

April 9, 2025 8:47 PM April 9, 2025 8:47 PM

views 10

शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी अटक प्रशांत कोरटकरला जामीन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महामानवांचा अवमान केल्याप्रकरणी अटक असलेल्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ५० हजार रुपयांच्या जामीनावर त्याची सुटका करण्यात आली आहे. न्यायाधीश डी व्ही कश्यप यांच्यासमोर आज या प्रकरणी सुनावणी झाली. १२ एप्रिल रोजी कोरटकरच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपणार होती. 

March 28, 2025 6:53 PM March 28, 2025 6:53 PM

views 13

प्रशांत कोरटकरला २ दिवसांची पोलीस कोठडी

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूरच्या न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. २५ मार्चला त्याला अटक झाल्यानंतर न्यायालयानं त्याची रवानगी ३ दिवसांच्या पोलीस कोठडीत केली होती.    दरम्यान, आज सुनावणी संपल्यानंतर पोलीस कोरटकरला घेऊन जात असताना एका वकिलानं त्याच्यावर पादत्राणानं हल्ला करायचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला पकडलं.

March 25, 2025 1:36 PM March 25, 2025 1:36 PM

views 9

फरार प्रशांत कोरटकर याला तेलंगणातून अटक

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली आहे. कोरटकर याने २४ फेब्रुवारी रोजी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनद्वारे धमकी दिली होती. त्या दिवसापासून कोरटकर हा फरार होता. कोरटकरला आज कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आलं असून पोलिसांनी सात दिवसांची कोठडी देण्याची विनंती केली आहे.