July 12, 2025 1:44 PM

views 14

प्रसार भारती आणि भारतीय हॅण्डबॉल संस्था यांच्यात सामंजस्य करार

हॅण्डबॉलच्या राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व स्पर्धांचं प्रक्षेपण करण्याच्या उद्देशाने  प्रसार भारती आणि भारतीय हॅण्डबॉल संस्था यांच्यात तीन वर्षांच्या कालावधीसाठी सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे आता डीडी स्पोर्ट्स, वेव्हज् ओटीटी आणि प्रसार भारतीच्या इतर वाहिन्यांवरून हॅण्डबॉल स्पर्धांचं प्रक्षेपण होणार आहे. देशात या खेळाचा प्रसार होत उदयोन्मुख खेळाडूंच्या प्रतिभेला वाव मिळण्याच्या उद्देशानं हा करार करण्यात आला आहे. 

December 12, 2024 3:48 PM

views 12

प्रसार भारतीचा हॉकी इंडियासोबत सामंजस्य करार

आगामी हॉकी इंडिया लीगचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी प्रसार भारतीनं आज नवी दिल्ली इथं हॉकी इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारामुळे, दूरदर्शन हॉकी इंडिया लीग २०२४-२५ साठी अधिकृत प्रसारण भागीदार बनले आहे.   या प्रसंगी हॉकी इंडिया लीग च्या प्रशासकीय समितीचे सदस्य भोलानाथ सिंग आणि प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांनी सामंजस्य कराराची देवाणघेवाण केली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, आकाशवाणीच्या महासंचालक प्रज्ञा पालीवाल गौर, दूरदर्शनच्या महासंचालक कांचन प्र...

November 25, 2024 7:18 PM

views 13

प्रसारभारती, रेलटेल, प्लेबॉक्सटीव्ही एकत्रितपणे रेलवायर ब्रॉडबॅन्ड ही स्वतंत्र योजना तयार

प्रसारभारती, रेलटेल आणि प्लेबॉक्सटीव्ही यांनी एकत्रितपणे रेलवायर ब्रॉडबॅन्ड ही स्वतंत्र योजना तयार केली आहे. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव दि्ववेदी आणि रेलटेलचे अध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार यांनी या योजनेचं आज नवी दिल्लीत उद्घाटन केलं. रेलवायर या रेलटेल कंपनीच्या किरकोळ इंटरनेट सेवेने ओटीटीसाठीची स्वतंत्र योजना आहे. या योजनेमुळे किफायतशीर दरात सर्वसामान्यांना वेगवान इंटरनेट सेवा मिळणार आहे. त्यात प्रसारभारतीच्या वेव्हजबरोबर इतर ९ ओटीटी सेवांचा तसंच ४०० हून अधिक लाईव्ह...

November 21, 2024 2:55 PM

views 22

प्रसार भारतीची WAVES ही नवी OTT सेवा सुरू

राष्ट्रीय प्रसारण सेवा अर्थात प्रसार भारतीनं आपलं ओटीटी व्यासपीठ वेव तयार केलं आहे. इफ्फीच्या उद्घाटन कार्यक्रमात त्याचं अनावरण झालं. जुन्या काळातला करमणूक ठेवा नव्या तंत्रज्ञानात लोकांसमोर आणण्यासाठी या व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली आहे. वेव या व्यासपीठाच्या माध्यमातून रामायण, महाभारत, शक्तीमान आणि हमलोग सारख्या मालिका पुन्हा पाहता येणार आहे. इतर ओटीटी व्यासपीठांपेक्षा वेव वैशिष्ट्यपूर्ण असेल, असं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सैगल म्हणाले. वेव द्वारे १२ भाषांतले १० प्रकारचे कार्यक्रम प्...

August 16, 2024 8:15 PM

views 18

प्रसारभारती आणि संसद टीव्ही यांच्यात सामंजस्य करार

प्रसारभारती आणि संसद टीव्ही यांच्यात आज एक सामंजस्य करार झाला. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आणि संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजित पुन्हानी यावेळी उपस्थित होते. संसाधनांची देवाण-घेवाण कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आणि एकमेकांच्या कार्यक्रमांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हा करार उपयुक्त ठरेल.    कार्यक्रमांची देवाण-घेवाण, प्रसारभारतीच्या ओटीटी मंचांवर संसद टीव्हीचं प्रसारण तसंच प्रशिक्षण सुविधांचा उपयोग करणं, हा या कराराचा उद्देश असल्याचं द्विवेदी यांनी सांगितलं.

August 10, 2024 3:55 PM

views 12

प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी आकाशवाणी मुंबई केंद्राला दिली भेट

प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान आज आकाशवाणी मुंबई केंद्राला भेट दिली आणि सर्व विभागांच्या कामाचा आढावा घेतला. श्रोत्यांना आवडण्याजोग्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना त्यांनी आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांना बैठकीदरम्यान केली. युवा आणि महिला केंद्रित कार्यक्रमांवर अधिक भर घ्यावा, आर्थिक आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने अधिकाधिक कार्यक्रम जाहिरातदारांपर्यंत घेऊन जावेत, असा सल्लाही त्यांनी दिला. वृत्तविभागाच्या प्रमुख सरस्वती कुवळेकर, कार्यक्रम प्रमु...