April 8, 2025 3:36 PM April 8, 2025 3:36 PM

views 19

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशीची प्रकाश आंबेडकरांची मागणी

परभणी इथले आंबेडकरी कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतल्या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी याचिकाकर्ते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबाद उच्च न्यायालयात केली. याप्रकरणी एसआयटी नेमावी, ती न्यायालयाच्या देखरेखीखाली असावी, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली आहे. सीआयडीलाही या प्रकरणात समाविष्ट करण्याचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे. 

November 16, 2024 5:28 PM November 16, 2024 5:28 PM

views 18

विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडी सत्तेत जाण्याचा प्रयत्न करेल- प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी सत्तेत जायचा प्रयत्न करेल, असं वक्तव्य पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केलं. आता तत्वांचं राजकारण संपलं असून संधीसाधू राजकारण सुरू झालं आहे, असं आंबेडकर म्हणाले. महाराष्ट्रात शेतमालाचे भाव पडले आहेत त्यावर आज कुणीही बोलत नाही, तर धर्माच्या नावाने मतं मागितली जात आहेत. जातीजातीत फूट पाडली जात आहे, असंही आंबेडकर म्हणाले.

November 15, 2024 7:05 PM November 15, 2024 7:05 PM

views 13

काँग्रेसची NRC, मॉब लिंचिंग, कायदा सुव्यवस्था या प्रश्नांवर भूमिका नाही, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

गेल्या पाच वर्षामध्ये NRC, मॉब लिंचिंग, कायदा सुव्यवस्था या प्रश्नांवर काँग्रेसनं काहीही भूमिका घेतली नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. या सगळ्या प्रश्नांवर आपल्या पक्षाने भूमिका घेतली, असं ते अमरावतीत नांदगावमध्ये झालेल्या प्रचारसभेत म्हणाले.

November 11, 2024 7:23 PM November 11, 2024 7:23 PM

views 13

काँग्रेस आणि भाजपा नागरिकांची फसवणूक करत असल्याची प्रकाश आंबेडकर यांची टीका

काँग्रेस आणि भाजपा नागरिकांची फसवणूक करत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज वाशिम इथल्या प्रचारसभेत केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संविधानाच्या रंगावरून वाद घालून लोकांना भ्रमित करू नये, असंही आंबेडकर म्हणाले.

October 19, 2024 2:48 PM October 19, 2024 2:48 PM

views 13

‘हरियाणा, महाराष्ट्रात भाजपने क्रीमीलेअर आणि अनुसूचित जातींमधील वर्गीकरणाचा चुकीचा निर्णय लागू केला’

हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपने सर्वोच्च न्यायालयाचा क्रीमीलेअर आणि अनुसूचित जातींमधील वर्गीकरणाचा चुकीचा निर्णय लागू केल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आपल्या  ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही पक्षांना अनुसूचित जातींमध्ये विभागून त्यांचे एक होणे थांबवायचे आहे. निवडणूकीच्या काळात लोकांमध्ये फूट पाडून भाजप आणि काँग्रेसला राजकीय लाभ घ्यायचा आहे. असंही ते म्हणाले. 

October 16, 2024 6:56 PM October 16, 2024 6:56 PM

views 14

अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी स्थापन केलेल्या समितीला वंचित बहुजन आघाडीचा विरोध

राज्यातल्या महायुती सरकारनं अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी स्थापन केलेल्या समितीला वंचित बहुजन आघाडीनं विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही भूमिका मांडली. राज्य सरकारनं काल अध्यादेश काढून यासाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. मागासवर्गीयांचं आरक्षण निकामी करण्याच्या उद्देशानंच हा अध्यादेश महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या संमतीनं काढला असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

September 9, 2024 7:01 PM September 9, 2024 7:01 PM

views 22

राज्यातल्या आदिवासी संघटनांना सोबत घेऊन विधानसभा निवडणूक लढवण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

वंचित बहुजन आघाडी राज्यातल्या सर्व आदिवासी संघटनाना सोबत घेऊन विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. आज मुंबईत वार्ताहर परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.  आरक्षित जागाच आदिवासींनी लढाव्यात असा एक समज निर्माण झाला आहे, तो या विधानसभेच्या निमित्तानं तोडायचा मानस आम्ही केला असून, काही सर्वसाधारण जागावर आदिवासी उमेदवार निवडणूक लढवतील, असं त्यांनी सांगितलं.   राज्यातले आदिवासी आता एकत्र आले असून, यापुढं त्यांची एकत्रित वाटचाल होणार आहे. या दृ...

July 30, 2024 7:57 PM July 30, 2024 7:57 PM

views 16

मनोज जरांगे यांनी विधानसभेच्या २८८ जागा लढवाव्यात – प्रकाश आंबेडकर

मराठा समाजातल्या गरीबांसाठी मनोज जरांगे यांनी विधानसभेच्या २८८ जागा लढवाव्यात, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. वंचित बहुजन आघाडीनं लातूर इथं काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेत ते बोलत होते. मराठा समाजात श्रीमंत आणि गरीब असे दोन गट आहेत. त्यामुळे जरांगे यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरून सर्व जागा लढवाव्यात असं ते म्हणाले.

July 17, 2024 3:55 PM July 17, 2024 3:55 PM

views 12

वंचित बहुजन आघाडीकडून २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुंबईत चैत्यभूमी इथून या यात्रेला प्रारंभ होणार असून, विदर्भ तसंच मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यात मार्गक्रमण करत, आठ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर इथं या यात्रेची सांगता होणार आहे.   ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे, एसटी एससी शिष्यवृत्ती वाढ झाली पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना एसटी एससी शिष्यवृत्ती लागू झाली पाहिजे, तसंच जे कुणबी आ...

July 16, 2024 6:29 PM July 16, 2024 6:29 PM

views 19

वंचित बहुजन आघाडीची २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा

ओबीसी आरक्षण तसंच अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी येत्या २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार आहे. पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मुंबईत चैत्यभूमी इथून या यात्रेला सुरुवात होणार असून विदर्भ, मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातून या यात्रेचा प्रवास होईल. ८ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर इथं यात्रेची सांगता होणार आहे.    एसटी, एससी शिष्यवृत्ती वाढ व्हावी, ओबीसी विद्यार्थ्यांना एसटी एससी शिष्यवृत्ती लागू करावी, तसंच जे कुणबी आहेत त्यांना...