August 2, 2025 8:11 PM August 2, 2025 8:11 PM

views 5

बलात्कार प्रकरणी दोषी ठरलेला माजी खासदार प्रज्वल रेवाण्णाला आजन्म कारावास

अश्लील व्हिडीओ आणि बलात्कार प्रकरणी दोषी ठरलेल्या माजी खासदार प्रज्वल रेवाण्णा याला, बंगळूरूमधल्या लोकप्रतिनिधींसाठी असलेल्या विशेष न्यायालयानं आज  आजन्म  कारावासाची शिक्षेसह १० लाख रुपये दंड ठोठावला. तसंच पीडितेला ७ लाख रुपये दंड स्वरूपात देण्याचे आदेश दिले. न्यायलयानं काल रेवाण्णा याला वारंवार बलात्कार, तसंच आपल्या पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी दोषी ठरवलं होतं.    प्रज्वल रेवाण्णा याच्या विरोधात अशाच स्वरूपाचे आणखी तीन खटले सुरु आहेत.