January 2, 2026 8:06 PM January 2, 2026 8:06 PM

views 1

प्रगती व्यासपीठामुळं ८५ लाख कोटी रुपयांच्या सव्वा ३ हजारांहून अधिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या गतीमध्ये वाढ

केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रगती व्यासपीठामुळं ८५ लाख कोटी रुपयांच्या रकमेचे सव्वा ३ हजारांहून अधिक प्रकल्पांची गती वाढली. विविध ६१ सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर यातून लक्ष दिलं जात असल्याची माहिती कॅबिनेट सचिव टी व्ही सोमनाथन यांनी आज नवी दिल्लीत दिली. या व्यासपीठाचा आढावा घेतल्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारांमधला समन्वय वाढवून महत्वाच्या प्रकल्पांमधले अडथळे दूर करण्यासाठी याची सुरुवात झाली होती.