November 25, 2024 6:46 PM

views 26

विधानसभा निवडणुकीत यशाचं श्रेय तिघांना एकसमान-प्रफुल पटेल

विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र म्हणून काम केलं, त्यामुळे यशाचं श्रेय या तिघांना एकसमान आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. संसद परिसरात ते  प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  तिन्ही पक्षांचे नेते एकत्र चर्चा करुन मुख्यमंत्रीपदाविषयी निर्णय घेतील आणि त्यामुळे यावरून संघर्ष निर्माण होणार नाही, असंही ते म्हणाले. 

July 30, 2024 8:27 PM

views 13

सरकारने आर्थिक शिस्तीचा अवलंब करुन देशाची आर्थिक स्थिती सुधारली – प्रफुल्ल पटेल

राज्यसभेत आजही अर्थसंकल्पावरची चर्चा झाली. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी २०१४ पासून सरकारने आर्थिक शिस्तीचा अवलंब करुन देशाची आर्थिक स्थिती सुधारल्याचं प्रतिपादन केलं. गेल्या दहा वर्षांत देशात रस्ते, पूल, विमानतळ, बंदरं आणि नूतनीकरणक्षम उर्जा यांचं जाळं निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलंं.

June 17, 2024 2:30 PM

views 29

‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधे राष्ट्रवादी काँग्रेस ८५ ते ९० जागा मागणार’

आगामी विधानसभा निवडणुकीत ८५ ते ९० जागा लढवण्याचा इरादा राष्ट्रवादी काँग्रेसनं व्यक्त केला आहे. महायुतीमधे तेवढ्या जागा पक्ष मागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी आज गोंदिया इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. लोकसभा निवडणुकीत NDA ला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी विधानसभा निवडणुकीत चित्र बदलेल असं ते म्हणाले.   राज्यात लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं. केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मंत्रीपद आलं तर ते मलाच मिळेल, असं ते म्ह...