April 8, 2025 9:03 PM April 8, 2025 9:03 PM

views 7

मुद्रा योजनेनं उद्योजकतेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला-प्रधानमंत्री

मुद्रा योजनेनं उद्योजकतेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. यामुळे महिलांना आर्थिक सहाय्य तर मिळालंच पण त्यांच्या व्यवसायाच्या विकासासाठी अनेक संधी निर्माण झाल्या असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मुद्रा योजनेला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विविध लाभार्थ्यांशी नवी दिल्लीत चर्चा करताना ते बोलत होते.    देशातल्या तरुणांना सक्षम, स्वावलंबी करणं आणि त्यांना आत्मविश्वास मिळवून देणं तसंच केवळ नोकरी शोधणाऱ्यांऐवजी रोजगार निर्माण करण्याची क्षमता निर्माण करणं हे या योजनेचं उद्द...

April 8, 2025 10:34 AM April 8, 2025 10:34 AM

views 17

प्रधानमंत्री मुद्रा योजनेची दशकपूर्ती

प्रधानमंत्री मुद्रा योजनेला १० वर्ष पूर्ण होत आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३२ लाख कोटी रुपयांची ५२ कोटींहून अधिक कर्जं वितरित करण्यात आली आहेत. आर्थिक समावेशन आणि उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना १० लाखांपर्यंतचं तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं पंतप्रधान मोदींनी २०१५ मध्ये ही योजना सुरू केली होती. मुद्रा योजनेच्या दशक पूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार असून सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे.

April 7, 2025 12:24 PM April 7, 2025 12:24 PM

views 18

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ५२ कोटीहून अधिक कर्ज मंजूर

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत आजपर्यंत ३२ लाख कोटीपेक्षा जास्त किमतीचे  ५२ कोटीहून अधिक कर्ज मंजूर करण्यात आलं आहे.  यापैकी ७० टक्के कर्ज महिला उद्योजकांनी घेतल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. तर एकूण कर्जापैकी ५० टक्के कर्ज एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातल्या उद्योजकांनी घेतलं आहे. लघु उद्योजकांना सक्षम करण्यासाठी ही योजना २०१५ पासून सुरू करण्यात आली आहे.