September 28, 2025 1:21 PM September 28, 2025 1:21 PM
60
काय आहे प्रधानमंत्री जनधन योजना ?
सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सतत कार्यरत आहे. सेवा पर्व या मालिकेत प्रधानमंत्री जनधन योजनेविषयी जाणून घ्या.... गेल्या दशकभरात आर्थिक समावेशनाला केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. २०१४ मधे सरकारने प्रधानमंत्री जनधन योजनेला सुरुवात केली. बँक खाती उघडणं एवढाच याचा हेतू नव्हता तर नागरिकांना सक्षम करण्यासाठी या योजनेची आखणी करण्यात आली आहे. जनधन योजने अंतर्गत देशभरात ५६ कोटी बँक खाती उघडण्यात आली...