September 23, 2024 11:41 AM September 23, 2024 11:41 AM
13
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला आज ६ वर्ष पूर्ण
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाली. पाच लाखांपर्यंतच्या मोफत आरोग्य विम्यासह, कौटुंबिक काळजी, महिलांची प्रतिष्ठा, मोठ्यांचा आदर, निरोगी आणि सुरक्षित भारताच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल मानलं जातं. आतापर्यंत जवळपास ४९ टक्के आयुष्मान कार्ड महिलांना वितरीत करण्यात आल्याचं सरकारने सांगितलं आहे. आयुष्मान कार्ड वितरीत करण्यात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.