January 15, 2025 10:39 AM January 15, 2025 10:39 AM

views 11

नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ लाख २० हजार पात्र लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात एक लाख २० हजार पात्र लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी ही माहिती दिली. ऑनलाइन नोंदणी झालेल्या पात्र लाभार्थ्यांना लवकरच उद्दिष्टानुसार मंजुरी देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.