May 10, 2025 8:22 PM May 10, 2025 8:22 PM

views 10

लातूर शहरात उद्या वीजपुरवठा बंद

लातूर शहरात महापारेषण कंपनीच्या उपकेंद्राची देखभाल, दुरूस्ती तसंच उच्चदाब वीजवाहिन्या बदलण्याचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे शहरातल्या आर्वी उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या, शिवाजी चौक ते अंबेजोगाई रोड परिसराचा वीजपुरवठा, उद्या सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. वीजग्राहकांनी या वेळेची दखल घ्यावी, असं आवाहन महावितरण कंपनीनं केलं आहे,