March 5, 2025 2:59 PM March 5, 2025 2:59 PM

views 8

‘रोजगार, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेषात गुंतवणूक ही संकल्पना विकसित भारताची रूपरेषा स्पष्ट करणारी’

रोजगार, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेषात गुंतवणूक ही संकल्पना विकसित भारताच्या मार्गाची रूपरेषा स्पष्ट करणारी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. यंदाच्या अर्थसंकल्पाच्या परिप्रेक्ष्यात रोजगारविषयक बाबींविषयी आयोजित वेबिनारला ते संबोधित करत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात या संकल्पनेचा प्रभाव दिसत आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प भारताच्या भविष्याची ब्लूप्रिंट आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा आणि उद्योगांप्रमाणेच रोजगार, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेषालाही प्राधान्य दिलं आहे, असं मोदी म्हणा...

March 4, 2025 7:23 PM March 4, 2025 7:23 PM

views 9

भारत हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी विकासाचं इंजिन बनल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर काम केल्यामुळे देशात विकास कामांना चालना मिळाली. गेल्या दहा वर्षांत देशात सातत्यानं झालेल्या सुधारणा, आर्थिक शिस्त, कामांत आलेल्या पारदर्शकतेमुळे उद्योग क्षेत्राचा सर्वसमावेशक विकास झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं.  अर्थसंकल्पानंतर सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर आयोजित वेबिनारमध्ये प्रधानमंत्री बोलत होते.  देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार काम करत असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं.    देशाच्या आर्थिक विकासात सुक्ष्...

March 4, 2025 9:54 AM March 4, 2025 9:54 AM

views 9

अर्थसंकल्पानंतरच्या तीन वेबिनारमध्ये प्रधानमंत्री सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अर्थसंकल्पानंतरच्या तीन वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत. अर्थसंकल्पीय घोषणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि त्यासाठीचे प्रयत्न अधोरेखित करण्यासाठी या वेबिनारचं आयोजन करण्यात आलं आहे. हे वेबिनार एमएसएमईच्या वाढीसाठी उपयुक्त योजना, उत्पादन, निर्यात आणि अणुऊर्जा मोहिमा तसंच गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेमध्ये सुधारणा या विषयावर आयोजित करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. या वेबीनारच्या माध्यमातून सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर...