August 3, 2025 2:21 PM August 3, 2025 2:21 PM

views 22

पोर्तुगालमध्ये उष्णतेची लाट,तापमान ४४ अंशांवर पोहोचण्याची शक्यता

पोर्तुगालमधे आज उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेसोबतच जंगलातल्या वणव्यांमुळे तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत उष्णता आणि वणव्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचं पोर्तुगालच्या गृहमंत्री मारिया लुसिया यांनी सांगितलं.   उत्तर आफ्रिकेतून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमान सतत वाढत असून पोर्तुगालमध्ये सध्या ३९ ठिकाणी जंगलात आग लागली आहे. यापैकी ९ ठिकाणी परिस्थिती अधिक गंभीर आहे.

June 10, 2025 3:32 PM June 10, 2025 3:32 PM

views 18

महाराष्ट्राबरोबर सहकार्य वाढवण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक

महाराष्ट्राबरोबर सहकार्य वाढवण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक असल्याचं पोर्तुगालचे राजदूत जोओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी अल्मेडा, यांनी सांगितलं मुंबईत आज राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. भारताशी पर्यटन आणि व्यापारासह विविध क्षेत्रात सहकार्य वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई दौऱ्यात आपण शंभराहून अधिक उद्योग प्रतिनिधींना भेटणार असल्याचंही राजदूतांनी सांगितलं. राज्यपालांनी यावेळी बोलताना, पोर्तुगाल आणि भारतादरम्यानचा सध्याचा व्यापार १ अब्ज दोन कोटी डॉलर वरून किमान १० अब...

April 8, 2025 8:08 PM April 8, 2025 8:08 PM

views 11

राष्ट्रपती यांची दुसऱ्या दिवशी आज पोर्तुगालच्या संसदेला भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पोर्तुगाल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज पोर्तुगालच्या संसदेला भेट दिली. तिथं त्यांना पारंपरिक मानवंदना देण्यात आली. सभापती जोस पेद्रो अग्वार ब्रांको यांच्याशी आणि इतर संसद सदस्यांशी त्यांनी सौहार्दपूर्ण चर्चा केली. राष्ट्रपतींनी  चंपालमो फाऊंडेशन आणि राधाकृष्ण मंदिराला भेट दिली. त्यानंतर अलमेडा इथं राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यावर आदरांजली अर्पण केली. पोर्तुगालमधल्या भारतीय समुदायाशी त्यांनी संवाद साधला.     उद्या आणि परवा म्हणजे ९ आणि १० तारखेला राष्ट्...