April 29, 2025 10:13 AM April 29, 2025 10:13 AM

views 14

७ तारखेपासून दिवंगत पोप फ्रान्सिस यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठीची गोपनीय बैठक सुरू होणार

दिवंगत पोप फ्रान्सिस यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठीची गोपनीय बैठक पुढील महिन्याच्या ७ तारखेपासून सुरू होणार असल्याचं व्हॅटिकननं जाहीर केलं आहे. गेल्या २१ एप्रिल रोजी पोप फ्रान्सिस यांचं निधन झाल्यानंतर सध्याच्या काळात व्यवस्थापन करणाऱ्या कार्डिनल्स चर्चच्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला.   यामधील परंपरेनुसार सिस्टीन चॅपलमध्ये मतदान होणार असून  या प्रक्रियेच्या तयारीसाठी सिस्टीन चॅपल कालपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आलं आहे. जगभरातील २२५ कार्डिनलपैकी ८० वर्षांखालील केवळ १३५ कार्डिनल या न...

April 26, 2025 8:38 PM April 26, 2025 8:38 PM

views 6

पोप फ्रान्सिस यांच्यावर रोममध्ये अंत्यसंस्कार

पोप फ्रान्सिस यांच्यावर आज रोममध्ये बेसिलिका ऑफ सँता मारीया मेगर इथं कार्डिनल जिओव्हॅनी बॅटिस्टा रे यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. व्हॅटिकन सिटी इथून निघालेल्या या अंत्ययात्रेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे अध्यक्ष ईमॅन्युअल मॅक्रोन यांच्यासह इतर अनेक जागतिक नेते, धर्मगुरू तसंच लाखो नागरिक उपस्थित होते. सोमवारी पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं होतं.

April 26, 2025 1:30 PM April 26, 2025 1:30 PM

views 21

पोप फ्रान्सिस यांच्यावर आज अंत्यसंस्कार

पोप फ्रान्सिस यांच्यावर आज आज रोम इथल्या ‘बॅसिलिका ऑफ सेंट मेरी मेजर’ इथं अंत्यसंस्कार होत आहे. जगभरातून विविध देशांचे प्रतिनिधी, तसंच कॅथलिक ख्रिश्चन बांधव पोप फ्रान्सिस यांना आदरांजली वाहण्यासाठी रोममध्ये जमले आहेत. भारताचं प्रतिनिधित्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हेसुद्धा यावेळी उपस्थित असतील.   त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी देशात आज दुखवटा पाळला जात आहे. सर्व शासकीय इमारतींवरचा राष्ट्रध्वज अर्ध्य...

April 25, 2025 1:23 PM April 25, 2025 1:23 PM

views 8

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती व्हॅटिकन सिटीच्या दौऱ्यावर

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी आणि भारत सरकार आणि जनतेच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या व्हॅटिकन सिटी दौऱ्यावर रवाना झाल्या. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू आणि राज्यमंत्री जॉर्ज कुरियन तसंच गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष जोशुआ डिसूझा त्यांच्या सोबत आहेत.   राष्ट्रपती मुर्मू व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटरच्या बॅसिलिका इथं पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहतील. उद्या त्या जगभरातल्या मान...

April 24, 2025 7:53 PM April 24, 2025 7:53 PM

views 7

पोप फ्रान्सिस यांच्यावर येत्या २६ तारखेला अंत्यसंस्कार

कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्यावर येत्या २६ तारखेला अंत्यसंस्कार केले जाणार असून त्यादिवशी भारतात राजकीय शोक पाळण्यात येणार आहे. गृहमंत्रालयाने दिलेल्या एका निवेदनानुसार, संपूर्ण भारतात जिथे नियमितपणे राष्ट्रध्वज फडकावला जातो, त्या सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाईल. तसंच, त्या दिवशी मनोरंजनाचे कोणतेही अधिकृत कार्यक्रम होणार नाहीत. याआधी सरकारने पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला होता.

February 23, 2025 6:57 PM February 23, 2025 6:57 PM

views 8

पोप फ्रान्सिस यांची प्रकृती सध्या स्थिर

पोप फ्रान्सिस हे प्रकृतीअस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रोममधल्या स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे. पोप फ्रान्सिस यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाला असून त्यांना रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी त्यांना प्राणवायूचा सातत्याने पुरवठा केला जात आहे.