May 30, 2025 3:08 PM

views 23

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पूंछ शहराला भेट

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकव्याप्त काश्मीरच्या गोळीबारात सीमावर्ती भागातल्या मालमत्ता आणि धार्मिक स्थळांना झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पूंछ शहराला भेट दिली. तसंच पाकव्याप्त काश्मीरच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांच्या तक्रारी ऐकल्या, अशी माहिती आमच्या जम्मू इथल्या प्रतिनिधीने दिली.   इथल्या विश्रांती गृहावर झालेल्या कार्यक्रमात  गृहमंत्र्यांनी बाधित कुटुंबांना आर्थिक मदत वाटप केली आणि गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्...

September 13, 2024 12:38 PM

views 25

जम्मू आणि काश्मीर : पूंछमध्ये एका दहशतवाद्याला स्फोटकं आणि दारूगोळ्यांसह अटक

जम्मू आणि काश्मीरमध्ये, पूंछ जिल्ह्यात सुरनकोटच्या पोथा बायपास इथं सुरक्षा दलांनी काल संध्याकाळी जम्मू आणि काश्मीर गझनवी फोर्स संघटनेच्या एका दहशतवाद्याला स्फोटकं आणि दारूगोळ्यांसह अटक केली. प्राथमिक तपासात त्याची ओळख दर्याला नौशेरा इथला रहिवासी मोहम्मद शाबीर अशी झाली आहे. तो पाकव्याप्त काश्मीर इथल्या प्रमुख दहशतवाद्याच्या संपर्कात होता. याबाबत अधिक तपास सुरू असून आणखी अटक होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.